एक्स्प्लोर

IPL 2020 | आज दिल्ली आणि बंगलोर आमने-सामने, कोणत्या खेळाडूंच्या कामगिरीवर असणार नजर?

दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

दुबई : आयपीएल -13 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स (DC) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) समोर मैदानात उतरेल. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या मोसमात आतापर्यंत दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पॉईंट टेबलमध्ये दिल्लीचा संघ दुसर्‍या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानेही या हंगामात 4 पैकी तीन सामने जिंकले आहेत. एका सामन्यात त्यांचा पराभव झाला. पॉईंट टेबलमध्ये बंगलोर तिसऱ्या क्रमांकावर आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी जाण्यासाठी मैदानात उतरतील. खालील पाच खेळाडूंच्या कामगिरी सर्वांच्या नजरा असतील.

विराट कोहली

आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. कोहलीने दिल्लीविरुद्ध आतापर्यंत आठ अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर दिल्लीविरुद्धची त्याची सरासरी 63.46 आणि स्ट्राईक रेट 139 आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या सामन्यात नाबाद अर्धशतक ठोकणारा कोहलीही या सामन्यात मोठा डाव खेळू शकतो.

श्रेयस अय्यर

कोलकाता विरुद्ध अवघ्या 38 चेंडूत 88 धावांची खेळी करणारा दिल्ली कॅपिटलचा कर्णधार श्रेयस अय्यर हा त्याच्या संघातील सर्वात मजबूत खेळाडूंपैकी एक आहे. गेल्या काही सामन्यांमधून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत आहे. अय्यर डाव सावरणे आणि वेगाने धावा काढण्यासही सक्षम आहे. अशा परिस्थितीत आरसीबीविरुद्धच्या मोठ्या सामन्यात सर्वांच्या नजरा त्यांच्या कामगिरीवर असतील.

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का; अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

देवदत्त पड्डिकल

युवा खेळाडू देवदत्त पड्डिकल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंतच्या त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत. तत्पूर्वी, त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 63 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. अशा परिस्थितीत तो आजही मोठी खेळी करू शकतो.

ऋषभ पंत

वेगाने धावा काढण्यात माहीर असलेला विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या मोसमात आतापर्यंत मोठा डाव खेळू शकलेला नाही. मात्र काही सामन्यात त्याने वेगवान खेळ केला आहे. त्यामुळे पंतची बॅक आरसीबीविरुद्ध काही कमाल दाखवू शकेल याकडे सर्वांच्या नजरा असतील.

कागिसो रबाडा

आयपीएल 2017 पासून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने आयपीएलच्या सर्व सामन्यांमध्ये विकेट घेतल्या आहेत. आजही त्याला ही लय कायम ठेवायची आहे. वेगवान बाउन्सर आणि अचूक यॉर्कर गोलंदाजीमुळे रबाडाने कोहलीला अडचणीत आणलं आहे. अशा परिस्थितीत आजही ते आरसीबीसाठी धोकादायक ठरु शकतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Embed widget