एक्स्प्लोर

IPL 2020 : हैदराबादविरुद्ध मुंबईचे पारडे जड, मात्र दोन सलग विजयाने हैदराबाद फार्मात

आज आयपीएलमध्ये दुपारच्या सत्रात मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचे पारडे सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पारडे जड मानले जात आहे.

शारजाह : आज आयपीएलमध्ये दुपारच्या सत्रात मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. धडाकेबाज फलंदाजांची फळी आणि अखेरच्या षटकांत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणणारा गोलंदाजीचा मारा ही वैशिष्ट्ये असणाऱ्या मुंबई इंडियन्सचे पारडे सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पारडे जड मानले जात आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा वाहणारा भुवनेश्वर कुमार या सामन्यात खेळू न शकल्यास हैदराबादच्या चिंतेत आणखी भर पडेल. भुवीला मागील सामन्यात दुखापत झाल्याने ओव्हरही पूर्ण करता आली नव्हती.

दुसरीकडे हैदराबादनं मागील दोन सामन्यात दिल्ली आणि चेन्नईसारख्या मजबूत संघांवर विजय मिळवला आहे. डेविड वार्नरची हैदराबाद  टीम विजयाची हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर मागील सामन्यात मुंबईने पंजाबला हरवलं होतं. गुणतालिकेत मुंबई आणि हैदराबादला समान चार अंक आहेत. दोन्ही संघाने दोन विजय मिळवलेत तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज विजय मिळवून आपले दोन अंक वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा राहिल. शारजाह क्रिकेट स्टेडिअमवर आज दुपारी साडेतीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

तळाच्या दोन संघांमध्ये दुसरी लढत

‘आयपीएल’च्या आज दुसऱ्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि के एल राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब पराभवाची कोंडी फोडण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. चेन्नई गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे तर पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांनी तीन पराभवाचा सामना केला आहे. चारपैकी तीन लढतीत पराभव पत्करावा लागल्याने या सामन्याद्वारे विजयीपथावर परतण्याचे दोन्ही संघांचे उद्दिष्ट असणार आहे. गेल्या सामन्यात अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो यांचे पुनरागमनही चेन्नईला तारू शकले नाही. सलामीवीर शेन वॉटसन आणि केदार जाधव यांचे अपयश चेन्नईला महागात पडत आहे.

चेन्नईकडून फलंदाजांचा फार्म ही चिंतेची बाब आहे. मुरली विजय, वॉटसन, केदार जाधवला साजेशी खेळी करता आलेली नाही. चेन्नईची आशा रायुडू, फाफ डू प्लेसीसकडून अधिक आहे. धोनीने देखील मागील सामन्यात एकाकी झुंज दिली होती. पंजाबकडून भन्नाट फार्मात असलेला कर्णधार के एल राहुल आणि मयांक अग्रवाल यांच्याकडे लक्ष असेल. दोघांनी जबरदस्त खेळी करत संघाला तारले आहे. पण हे दोघे वगळता अन्य फलंदाजांना आपला करिष्मा दाखवता आलेला नाही. तर गोलंदाजीची मजबूत फळी असून देखील मोठ्या धावसंख्या बनवूनही संघाला पराभव स्वीकारावे लागत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget