IPL 2020: तीन-तीन विदेशी खेळाडूंसह मैदानात उतरु शकतात रोहित-धोनी; 'हे' आहे कारण
चेन्नई आणि मुंबई अधिक भारतीय खेळाडूंचे पर्याय अधिक असल्यामुळे कोणते चार विदेशी खेळाडू मैदानात उतरायचे हा प्रश्न दोन्ही संघासमोर आहे.
आबूधाबी : इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा सीजन आजपासून सुरू होणार असून, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना होईल. आयपीएल सामन्यामध्ये संघांना प्लेईंग इलेव्हनमध्ये चार विदेशी खेळाडू खेळवण्याची संधी मिळते. तर सात भारतीय खेळाडूंना संधी दिली जाते. परदेशी खेळाडूंचे चांगले पर्याय असल्याने संघांना चार खेळाडू निवडण्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. परंतु चेन्नई आणि मुंबईकडे भारतीय खेळाडूंचे पर्याय अधिक असल्यामुळे कोणते चार विदेशी खेळाडू मैदानात उतरायचे हा प्रश्न दोन्ही संघासमोर आहे.
मुंबई इंडियन्समध्ये मात्र काही खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये निश्चित खेळणार आहेत. रोहित शर्मा, डी कॉक ओपनिंग करण्याची शक्यता आहे. तिसर्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी येऊ शकतो. त्यानंतर ईशान किशन, पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या या क्रमवारीत खेळाडू फलंदाजीला येण्याची शक्यता आहे.
मात्र मुंबई इंडियन्सची पहिली विकेट 10 किंवा 11 ओव्हरनंतर पडली तर हार्दिक, पोलार्डसारखे खेळाडू वर फलंदाजी करू शकतात. फिरकीपटू राहुल चाहरही खेळणार आहे. जसप्रीत बुमराह टी -20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असल्याने तो खेळणार आहे.
IPL 2020, MI vs CSK Preview: पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधला नवा संघर्ष
आता प्लेईंग इलेव्हनमध्ये अन्य दोन वेगवान गोलंदाज कोण असतील हा प्रश्न. मुंबई इंडियन्सकडे अनेक पर्याय आहेत. मुंबई इंडियन्समध्ये ट्रेंट बोल्ट, मिचेल मॅक्लेनॅगन, धवल कुलकर्णी, जेम्स पॅटिन्सन असे गोलंदाज आहेत. येथे बोल्ट आणि मॅक्लेनॅगन यापैकी एक गोलंदाज आणि धवल कुलकर्णी तसेच पॅटीनसनला बाहेर ठेवलं तर प्लेईंग इलेव्हनमध्ये केवळ तीन परदेशी खेळाडू खेळतील.
चेन्नईची प्लेईंग इलेव्हन?
शेन वॉटसन, अंबाती रायडू, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो, दीपक चाहर आणि पियुष चावला यांचं खेळणे जवळपास निश्चित आहे. मुरली विजय किंवा फाफ डु प्लेसी दोघांपैकी एका खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. शार्दुल ठाकूर की सॅम कॅरेन खेळणार हे निश्चित झाले नाही. त्याचवेळी इम्रान ताहिर किंवा मिशेल सॅटनर पैकी एका खेळाडूला संधी दिली जाईल.
IPL 2020, MI vs CSK LIVE: सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो आणि इम्रान ताहिर किंवा सॅटनर पैकी एका खेळाडूला संधी मिळणार आहे. मात्र डु प्लेसिस आणि सॅम कॅरेन खेळतील की नाही हे स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत दोन्ही संघ 4 नाही तर 3 परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरु शकतील.
पाहा व्हिडीओ : अबुधाबीत आयपीएलचा सलामीचा सामना, Mumbai Indians VS Chennai Super Kings पहिली लढत