एक्स्प्लोर

IPL 2020 : दिल्ली गुणतालिकेत पुन्हा नंबर वन, ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाकडे?

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सवर 5 विकेट्सनी मात करत पुन्हा गुणतालिकेत पहिला नंबर पटकावला आहे.9 सामन्यात 7 विजयांसह 14 गुण घेत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. तर 12 गुणांसह मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सवर विजय मिळवत पुन्हा गुणतालिकेत पहिला नंबर पटकावला आहे. 9 सामन्यात 7 विजयांसह 14 गुण घेत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. तर 12 गुणांसह मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज मुंबईने जर पंजाबविरुद्ध विजय मिळवला तर पुन्हा मुंबई एक नंबरवर येण्याची शक्यता आहे.

सध्या प्वाईंट टेबलमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे तर 12 गुणांसह मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटची बंगलोर 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. तर 8 गुणांसह कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे. हैदराबाद, चेन्नई आणि राजस्थान 6-6 गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहे. तर पंजाब चार गुणांसह तळाला आहे.

ऑरेंज कॅप राहुलकडे तर पर्पल कॅप रबाडाकडे

केएल राहुलने 8 सामन्यात 448 धावा बनवत ऑरेंज कॅप आपल्याकडेच राखली आहे.  मयंक अग्रवाल 382 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर फाफ डु प्लेसी 365 धावा बनवत तिसऱ्या तर शिखर धवन 359 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली 347 धावांसह पाचव्या स्थानी आहे. पर्पल कॅपच्या रेसमध्ये रबाडा  19 विकेट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर 13 विकेट्ससह चहल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर  जोफ्रा आर्चर 12 विकेट्ससह तिसऱ्या स्थानी आहे.

कालच्या सामन्यात शिखर धवन दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. चेन्नईने आधी फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 179 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने एक चेंडू राखून विजय मिळवला. चेन्नईवरील या विजयामुळे दिल्लीनं 14 गुणांसह गुणतालिकेत आपली जागा आणखी मजबूत केली आहे.

दिल्लीची चेन्नईच्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ खाते न उघडताच तंबूत परतला. यानंतर अजिंक्य रहाणेही पाचव्या षटकात केवळ 8 धावा करून बाद झाला. यानंतर शिखर धवनने चेन्नईच्या गोलंदाजांवर एकीकडून हल्ला सुरु ठेवला. दुसर्‍या विकेटसाठी त्याने श्रेयस अय्यरबरोबर महत्त्वपूर्ण 68 धावांची भागीदारी केली. मात्र अय्यर ब्राव्होच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात 23 धावांवर बाद झाला. यानंतर मार्कस स्टॉयनिसने आक्रमक पद्धतीने 14 चेंडूत 24 धावा केल्या. स्टॉयनिस बाद झाल्यानंतर एकवेळ दिल्लीने सामना हातातून गमावला असं वाटत होतं. मात्र अक्षर पटेलने 5 चेंडूत केलेल्या 21 धावा निर्णायक ठरल्या. अक्षर पटेलने त्यांच्या खेळी 3 षटकार लगावले.

शिखर धवनचं आयपीएलमधील पहिलं शतक

शिखर धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. यात त्याने 14 चौकार आणि एक षटकार खेचला. धवनचं आयपीएलमधील हे पहिलं शतक ठरलं. यंदाच्या मोसमात लोकेश राहुल, मयांक अगरवाल यांच्यानंतर शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. दीपक चहरने चेन्नईकडून उत्कृष्ट गोलंदाजी करत चार षटकांत केवळ 18 धावा देऊन दोन बळी घेतले. सॅम कुरन, शार्दुल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget