एक्स्प्लोर

IPL auction : आयपीएल लिलावात पॅट कमिन्स सर्वात महागडा खेळाडू तर मुंबईचा यशस्वी जैस्वाल करोडपती

वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉटरेल आणि शिमरॉन हेटमायरला अनुक्रमे साडेआठ कोटी आणि पावणेआठ कोटी रुपयांची बोली लागली. कॉटरेलला पंजाबनं, तर हेटमायरला दिल्लीनं विकत घेतलं.

 मुंबई : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा आगामी आयपीएलसाठी झालेल्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं कमिन्सवर तब्बल साडेपंधरा कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. आयपीएलच्या या लिलावात ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेलला 10 कोटी 75 लाख रुपयांची बोली लागली. किंग्स इलेव्हन पंजाबनं मॅक्सवेलवर पावणेअकरा कोटींची बोली लावली. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसवर बंगलोरनं दहा कोटी रुपयांची बोली लावली. वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉटरेल आणि शिमरॉन हेटमायरला अनुक्रमे साडेआठ कोटी आणि पावणेआठ कोटी रुपयांची बोली लागली. कॉटरेलला पंजाबनं, तर हेटमायरला दिल्लीनं विकत घेतलं. लेग स्पिनर पियुष चावला हा भारताचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पियुष चावलाला चेन्नई सुपर किंग्सनं सहा कोटी 75 लाखांची बोली लावली.
यशस्वी जैस्वाल झाला करोडपती
मुंबईचा युवा अष्टपैलू आणि भारताच्या अंडर नाईन्टिन संघाचा सदस्य यशस्वी जैस्वालवर आयपीएलच्या लिलावात तब्बल 2 कोटी 40 लाखांची बोली लावण्यात आली. राजस्थान रॉयल्सनं ती किंमत मोजून यशस्वीला आगामी आयपीएलसाठी आपल्या ताफ्यात सामील केलं. विशेष म्हणजे त्यानं अजूनही वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली नाही. दक्षिण आफ्रिकेतल्या अंडर नाईन्टिन विश्वचषकासाठी यशस्वीची भारतीय संघात निवड झाली आहे. यंदाच्या मोसमात यशस्वीनं विजय हजारे करंडकात द्विशतक झळकावलं होतं.
48 वर्षांचा प्रवीण तांबे केकेआरकडे
मुंबईचा अनुभवी लेग स्पिनर प्रवीण तांबेनं वयाच्या 48 व्या वर्षी आयपीएलच्या रणांगणातलं आपलं स्थान कायम राखलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला आगामी आयपीएलसाठी आपल्या संघात स्थान दिलं आहे. कोलकात्यानं तांबेला 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात सामील करुन घेतलं. प्रवीण तांबे हा सध्या 48 वर्षांचा आहे. त्यामुळं आयपीएलमध्ये खेळणारा तांबे हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार आहे. प्रवीण तांबेनं याआधीही आयपीएलच्या काही मोसमांत राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं होतं.
उनाडकटचा भाव घसरला
सौराष्ट्राचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला आयपीएलच्या लिलावात यंदा अवघी तीन कोटी रुपयांची बोली आली. राजस्थान रॉयल्सनं गेल्या मोसमासाठी उनाडकटला तब्बल साडेअकरा कोटींचा चढा भाव दिला होता. पण त्याच्या निराशानजक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर राजस्थाननं त्याला करारमुक्त केलं होतं. त्याच राजस्थाननं उनाडकटला यंदाच्या लिलावात तीन कोटी रुपयांत पुन्हा विकत घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI : वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या चुकांचा पाढा वाचला
वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी मॅचचा टर्निंग पॉईंट सांगितला, काय चुकले ते स्पष्ट केलं
IND vs WI 3rd ODI Playing XI : दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
IND vs WI 2nd T20 : गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
AB De Villiers : जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं
जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget