अजिंक्य रहाणेचं शतक व्यर्थ, दिल्लीकडून राजस्थानचा सहा विकेट्सनी धुव्वा
हाणेनं या सामन्यात आयपीएल कारकीर्दीतलं आपलं दुसरं शतक साजरं केलं. त्यानं 63 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 105 धावांची खेळी साकारली.
जयपूर : अजिंक्य रहाणेनं झळकावलेल्या नाबाद शतकानंतरही राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. जयपूरमधील आयपीएल सामन्यात दिल्लीनं राजस्थानचा चार चेंडू आणि सहा विकेट्सनी धुव्वा उडवला.
या सामन्यात राजस्थाननं दिल्लीला विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं होतं. रिषभ पंतनं 36 चेंडूंत नाबाद 78 धावांची खेळी उभारून दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या खेळीला सहा चौकार आणि चार षटकारांचा साज होता. सलामीच्या शिखर धवननं 54 आणि पृथ्वी शॉनं 42 धावांची खेळी केली.
अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्ससमोर 192 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रहाणेनं या सामन्यात आयपीएल कारकीर्दीतलं आपलं दुसरं शतक साजरं केलं. त्यानं 63 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 105 धावांची खेळी साकारली.
कर्णधार स्टीव्ह स्मिथनंही 32 चेंडूत आठ चौकारांसह 50 धावा फटकावल्या. राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर स्मिथचं हे सलग दुसरं अर्धशतक ठरलं. त्यामुळे राजस्थानला 20 षटकांत सहा बाद 191 धावांची मजल मारता आली.