एक्स्प्लोर
Advertisement
गेलचं वादळ, बंगळुरुचा गुजरातवर 21 धावांनी विजय
राजकोट : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात लायन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवला आहे. बंगळुरुने गुजरातचा 21 धावांनी धुव्वा उडवला. तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल बंगळुरुच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
आयपीएलच्या दहाव्या पर्वात गुजरातच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला. ख्रिस गेलनं पाच चौकार आणि सात षटकारांची उधळण करुन 38 चेंडूत 77 धावांची खेळी केली. विराट कोहलीनं 64, ट्रॅव्हिस हेडनं नाबाद 30 आणि केदार जाधवनं नाबाद 38 धावांची खेळी करुन गेलला साथ दिली. त्यामुळेच बंगळुरुला 20 षटकांत दोन बाद 213 धावांची मजल मारता आली.
नाद करायचा नाय! टी20 मध्ये 10 हजार धावा ठोकणारा गेल एकमेव
ब्रेंडन मॅक्युलम, फिंच यांनी बंगळुरुच्या आव्हानाला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्याची झुंज अपयशी ठरली. आयपीएलमध्ये बंगळुरुचा हा दुसरा विजय ठरला आहे. टी20 क्रिकेटच्या इतिहासात गेलने दहा हजार धावा ठोकण्याची कामगिरी बजावली आहे. याच सामन्यात गेलने हा पल्ला गाठला. टी20 मध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारा गेल हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement