एक्स्प्लोर
Advertisement
INDvsNZ : टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
महेंद्रसिंह धोनी तंदुरुस्त झाल्याने दिनेश कार्तिकच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. तर खलीलच्या जागी मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवच्या जागी विजय शंकरला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वेलिंग्टन : न्यूझीलंड दौऱ्यातील पाचव्या वन डे सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माची टीम इंडिया चौथ्या वन डेतील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानं मैदानात उतणार असून या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहेत.
महेंद्रसिंह धोनी तंदुरुस्त झाल्याने दिनेश कार्तिकच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. तर खलीलच्या जागी मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवच्या जागी विजय शंकरला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टीम इंडियानं सुरुवातीचे लागोपाठ तीन सामने जिंकून पाच सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली आहे. पण हॅमिल्टनच्या चौथ्या वन डेत न्यूझीलंडनं भारताचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. त्या वन डेत किवी गोलंदाजांनी टीम इंडियाचा अवघ्या 92 धावांत खुर्दा उडवून, भारतीय फलंदाजांची अब्रू वेशीवर टांगली.
हॅमिल्टनच्या त्याच लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढण्याच्या निश्चयानं टीम इंडिया वेलिंग्टनच्या मैदानात दाखल झाली आहे. धोनी संघात परतल्याने संघाला मजबुती मिळाली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत शेवटचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचं मोठं आव्हान टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर असणार आहे.
भारतानं 3-1 ने मालिका आधीच खिशात घातली आहे. मात्र सलग दुसरा सामना जिंकून न्यूझीलंड पुढील टी-20 मालिकेत आत्मविश्वासाने उतरण्याचा प्रयत्न करेल.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, विजय शंकर, शुभमन गिल, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पंड्या.
न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, कोलिन डी ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, हेनरी निकोल्स, टाड एस्टल, मॅट हेनरी, कोलिन मुनरो, जिम्मी नीशाम, मिशेल सेन्टनर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement