एक्स्प्लोर

INDvsAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 231 धावांचं आव्हान

विराट कोहलीच्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला. त्याआधी भारतानं तीन टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे. आता टीम इंडियानं वन डे सामन्यांची मालिका जिंकली, तर भारतीय क्रिकेटमधलं ते मोठं यश ठरेल.

मेलबर्न : विराट कोहलीच्या टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नवा इतिहास घडवण्यासाठी 231 धावांचं आव्हान आहे. भारतीय गोलंदाजांनी मेलबर्नच्या तिसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 48.4 षटकात अवघ्या 230 धावांत गुंडाळला आहे. त्यामुळे मेलबर्नच्या वन डेसह तीन सामन्यांची मालिका जिंकायची, तर भारतीय संघासमोर आता 231 धावांचं लक्ष्य आहे. मेलबर्नच्या वन डेवर आज सकाळपासून पावसाचं सावट होतं. त्यामुळे नाणेफेक जिंकताच भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय अचूक ठरवला. यजुवेंद्र चहलने 42 धावांत सहा फलंदाजांना माघारी धाडून ऑस्ट्रेलियाला गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. तर मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियामध्ये एकाच वनडे सामन्यात सहा विकेट्स घेणारा यजुवेंद्र चहल हा पहिलाच भारतीय फिरकीपटू ठरला आहे. मेलबर्नच्या तिसऱ्या वन डेतही विजय मिळवून, तीन सामन्यांची मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. भारतीय संघाने अॅडलेडची दुसरी वन डे जिंकून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला. त्याआधी भारतानं तीन टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे. आता टीम इंडियानं वन डे सामन्यांची मालिका जिंकली, तर भारतीय क्रिकेटमधलं ते मोठं यश ठरेल. विराट कोहलीच्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन वन डे सामन्यांची मालिका जिंकली, तर तो नवा इतिहास ठरेल. भारतीय संघाला आजवरच्या इतिहासात ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यांची द्विपक्षीय मालिका कधीही जिंकता आलेली नाही. किंबहुना 2016 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाला पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत तर 1-4 अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र या वेळी टीम इंडिया ऑस्ट्रेलियातली वन डे सामन्यांची मालिका जिंकण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. वन डे सामन्यांच्या आजवरच्या इतिहासात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात 1985 साली जागतिक विजेतेपद आणि 2008 साली सीबी सीरिजचं विजेतेपद पटकावता आलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
SRH vs RR Eliminator IPL 2026 : एकही चेंडू न खेळता राजस्थान रॉयल्स जाऊ शकतो आयपीएलमधून बाहेर? समजून घ्या IPLचा सर्वात खतरनाक नियम
एकही चेंडू न खेळता राजस्थान रॉयल्स जाऊ शकतो आयपीएलमधून बाहेर? समजून घ्या IPLचा सर्वात खतरनाक नियम
SRH vs RR  Eliminator IPL 2026: आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये आज राजस्थान आणि हैदराबाद भिडणार; पराभूत संघाची होणार EXIT
आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये आज राजस्थान आणि हैदराबाद भिडणार; पराभूत संघाची होणार EXIT
RCB vs GT IPL 2026 : बंगळुरूच्या 'रॉयल' वादळात गुजरातचा पालापाचोळा! फायनलचं तिकीट RCBच्या खिशात, पण पराभूत टायटन्सच्या हातात अजून एक संधी
बंगळुरूच्या 'रॉयल' वादळात गुजरातचा पालापाचोळा! फायनलचं तिकीट RCBच्या खिशात, पण पराभूत टायटन्सच्या हातात अजून एक संधी

व्हिडीओ

Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JalgaonCrime News: शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने 23 कोटींचा गंडा! 'टीडब्ल्यूजे' कंपनीचे मुख्य संचालक 'नार्वेकर' दांपत्य अटकेत, जळगाव आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने 23 कोटींचा गंडा! 'टीडब्ल्यूजे' कंपनीचे मुख्य संचालक 'नार्वेकर' दांपत्य अटकेत, जळगाव आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
Raigad Crime: आजी-आजोबांनी फोन उचलला नाही, नातू घरी पोहोचला, दोघांचे मृतदेह राख अन् पालापाचोळ्यात बघताच हादरला, खालापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
आजी-आजोबांनी फोन उचलला नाही, नातू घरी पोहोचला, दोघांच्या मृतदेहाची अवस्था पाहून हादरला, खालापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरेंनी मनात साचलेलं सगळं बाहेर काढलं, भुजबळ अडवायला गेल्यावर म्हणाले, मी बोलणारच, काय तो सोक्षमोक्ष....
सुनील तटकरेंनी मनात साचलेलं सगळं बाहेर काढलं, भुजबळ अडवायला गेल्यावर म्हणाले, मी बोलणारच, काय तो सोक्षमोक्ष....
Udayanraje Bhosale Satara: आंबेनळी घाटातील अपघातात मुलं गेली, उदयनराजे पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, 'स्वत:ला एकटं समजू नका, तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा'
आंबेनळी घाटातील अपघातात मुलं गेली, उदयनराजे पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, 'स्वत:ला एकटं समजू नका, तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा'
Pune Porsche case Vishal Agrawal: पोर्शे कारने उडवून दोघांचा जीव घेतला, पण अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा कायम, जेलमधून सुटताच जंगी सेलिब्रेशन
पोर्शे कारने उडवून दोघांचा जीव घेतला, पण अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा कायम, जेलमधून सुटताच जंगी सेलिब्रेशन
भोंदू अशोक खरातचा कारनामा आता सिनेमातून उलगडणार, शिवसेनेतील महिला नेता साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?
भोंदू अशोक खरातचा कारनामा आता सिनेमातून उलगडणार, शिवसेनेतील महिला नेता साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?
NCP Working Committee: सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची नवी यादी पाठवणार, तीन नेत्यांचा पत्ता कट
सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची नवी यादी पाठवणार, तीन नेत्यांचा पत्ता कट
Embed widget