एक्स्प्लोर
Advertisement
सायनाला कांस्य पदक, उपांत्य सामन्यात पराभूत होऊनही इतिहास रचला
सायनाने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. 1982 नंतर बॅडमिंटनच्या एकेरी प्रकारात भारताला मिळालेलं हे पहिलं पदक आहे.
जकार्ता: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. एशियाड स्पर्धेच्या नवव्या दिवशी सायनाने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. 1982 नंतर कोणत्याही एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारताला मिळालेलं हे पहिलं पदक आहे.
खरंतर सायना नेहवाल या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारेल असा अनेक क्रीडाप्रेमींचा अंदाज होता. मात्र उपांत्य सामन्यात तिला चीनच्या ताई त्झू यिंगकडून पराभव स्वीकारावा लागला. यिंगने सायनाचा 21-17, 21-14 असा पराभव केला.
जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम स्थानावर असलेल्या चीनच्या ताई त्झू यिंगने दहाव्या क्रमांकावरील सायनाचा हा सलग दहाव्यांदा पराभव केला आहे.
दरम्यान, ऑलिम्पिक कांस्ययविजेत्या सायनानं उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या रॅचनॉक इन्तेनॉनवर दोन सरळ सेट्समध्ये मात केली. सायनानं हा सामना 21-18, 21-16 असा जिंकत उपांत्य सामन्यात धडक मारली होती.
1982 सालानंतर पहिल्यांदाच एशियाडमध्ये भारताला बॅडमिंटन एकेरीचं पदक मिळालं. याआधी भारताच्या सय्यद मोदींनी 1982 सालच्या एशियाडमध्ये पुरुष एकेरीचं कांस्यपदक पटकावलं होतं.
18 व्या एशियाडमध्ये भारताला आतापर्यंत 37 पदकं मिळाली आहेत. यामध्ये 7 सुवर्ण, 10 रौप्य आणि 20 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदतालिकेत सध्या नवव्या स्थानावर आहे.
पंतप्रधानांकडून सायनाचं कौतुक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायनाच्या यशानंतर तिचं कौतुक केलं आहे. सायनाने इतिहास रचून आमची मान उंचावली आहे. एशियाडमधील तिचं कांस्य पदक हे महिला एकेरीतील भारताचं पहिलं पदक आहे. संपूर्ण भारताकडून तुझं अभिनंदन, असं मोदींनी ट्विट केलं आहे.
Trust @NSaina to make us proud and script history!
Her Bronze in the #AsianGames2018 is the first ever medal for India in the women's singles Badminton category. India congratulates our star badminton player for yet another success. pic.twitter.com/zifupmwsr0 — Narendra Modi (@narendramodi) August 27, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement