एक्स्प्लोर
किवींविरुद्ध रांचीमध्ये चौथी वनडे, धोनीच्या कामगिरीकडे चाहत्यांच्या नजरा
रांची: रांचीचा सुपुत्र आणि टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कामगिरी हे भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमधला चौथ्या वन डे सामन्याचं मुख्य वैशिष्ट्य ठरू शकतं. हा सामना उद्या रांचीमध्ये झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवला जाईल.
टीम इंडियानं मोहालीची तिसरी वन डे जिंकून या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मोहालीच्या मैदानात भारताच्या विजयात धोनीनंही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानं आधी अमित मिश्राच्या गोलंदाजीवर रॉस टेलर आणि ल्यूक रॉन्कीला यष्टीचीत केलं. मग चौथ्या क्रमांकावर खेळताना धोनीनं 91 चेंडूंमध्ये 80 धावांची खेळी करून विराटच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी रचली होती.
धोनीला दीर्घ कालावधीनंतर एक फलंदाज म्हणून गवसलेला फॉर्म टीम इंडियासाठी सुखावह ठरावा. साहजिकच आता रांचीला आपल्या घरच्या मैदानात धोनी काय कामगिरी बजावतो यावर सर्वांची नजर राहील. रांचीचा हा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकण्याची संधी धोनीच्या टीम इंडियाकडे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement