एक्स्प्लोर
अमेरिकेत भारतीय महिला हॉकी संघाचा सलग तिसरा विजय
न्यूयॉर्क : भारताच्या महिला हॉकी संघानं अमेरिका दौऱ्यात सलग तिसरा विजय साजरा केला. मॅनहेममध्ये झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी कॅनडाचा 3-1 असा धुव्वा उडवला.
या सामन्यात पूनम रानीनं 19 व्या मिनिटाला गोल करुन भारताचं खातं उघडलं होतं. पण कॅनडासाठी नताली सौरिसोनं 21 व्या मिनिटाला गोल डागून कॅनडाला बरोबरी साधून दिली. मात्र त्यानंतर भारतीय महिलांनी आक्रमक खेळ करुन सामन्यावर आपली पकड मिळवली.
रेणुका यादवनं 32 व्या आणि अनुराधा देवीनं 58 व्या मिनिटाला गोल झळकावून भारताचा 3-1 असा विजय निश्चित केला. भारताने आपल्या तिसऱ्या सामन्यातही कॅनडाचा 5-2 असा धुव्वा उडवला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
क्राईम
Advertisement