एक्स्प्लोर
भारतीय महिला संघाकडून आशिया चषकात पाकिस्तानचा धुव्वा

बँकॉक : भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा 17 धावांनी धुव्वा उडवून ट्वेन्टी ट्वेन्टीच्या आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताने दिलेल्या 122 धावांच्या मोबदल्यात पाकिस्तान महिला संघाला केवळ 104 धावाच करता आल्या.
बँकॉकमध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला विजयासाठी वीस षटकांत 122 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानला ते आव्हान पेलवलं नाही. भारतीय आक्रमणासमोर पाकिस्तानला वीस षटकांत सहा बाद 104 धावांचीच मजल मारता आली.
अनुभवी मिताली राज भारताच्या विजयाची प्रमुख शिल्पकार ठरली. मितालीने 65 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद 73 धावांची खेळी उभारली. त्यामुळेच भारताला वीस षटकांत पाच बाद 121 धावांची मजल मारता आली.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























