एक्स्प्लोर

Mohammed Shami : वर्ल्डकप फायनल हरताच टीम इंडिया मानसिक धक्क्यात; पीएम मोदी पोहोचले ड्रेसिंग रुममध्ये, मोहम्मद शमीची घेतली गळाभेट

पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. कॅप्टन रोहित शर्मा लगेच ड्रेसिंग रूममध्ये गेला. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादला पोहोचले होते. 

PM Narendra Modi consoling mohammed Shami : 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभव भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. 43व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने दोन धावा काढताच कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. कॅप्टन रोहित शर्मा लगेच ड्रेसिंग रूममध्ये गेला. मोहम्मद सिराज मैदानावरच रडू लागला. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादला पोहोचले होते. 

फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडिया मानसिक धक्क्यात गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी संपर्क साधला आणि त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमची टूर्नामेंट खूप चांगली होती पण काल ​​आम्ही हरलो. आपण सर्व दु:खी आहोत पण आपल्या लोकांचा पाठिंबा आपल्याला पुढे नेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल ड्रेसिंग रुमची भेट विशेष आणि खूप प्रेरणादायी होती.

नरेंद्र मोदींकडून दोन ट्विट 

वर्ल्डकप फायनलनंतर पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर लिहिले, 'प्रिय टीम इंडिया, विश्वचषकातील तुमची प्रतिभा आणि दृढनिश्चय उल्लेखनीय होता. तुम्ही मोठ्या भावनेने खेळून देशाचा गौरव केला. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत.'' ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन करताना त्यांनी लिहिले की, 'विश्वचषकातील शानदार विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! संपूर्ण स्पर्धेत त्यांची कामगिरी प्रशंसनीय होती ज्याचा शेवट दणदणीत विजयाने झाला. आजच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ट्रॅव्हिस हेडचे अभिनंदन.

पंतप्रधानांनी ट्रॉफी दिली 

नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला विश्वचषक ट्रॉफी दिली. सामना संपण्यापूर्वी पंतप्रधान स्टेडियमवर पोहोचले. त्याने प्रेक्षकांमध्ये बसून सामना पाहिला. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स हेही त्यांच्यासोबत होते.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget