WBC 2022 : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना स्पर्धेबाहेर, तर चिराग-सात्विकसाईराज जोडीची उपांत्य पूर्व फेरीत धडक
World Badminton Championship 2022 : जपानच्या टोकियो येथे सुरु जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू संमिश्र कामगिरी करत असून महिला एकेरीमध्ये स्टार प्लेअर सायनाला पराभव पत्करावा लागला आहे.
BWF World Badminton Championship : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये (World Badminton Championship 2022) भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला (Saina Nehwal) महिला एकेरीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. थायलंडच्या बी. ओंगबमरुंगफन (B. Ongbamrungphan) हिने सायनाला 17-21 21-16 13-21 च्या फरकाने मात देत स्पर्धेबाहेर केलं आहे. दुसरीकडे भारताची पुरुष बॅडमिंटनपटूंची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (Satwiksairaj Rankeyreddy and Chirag Shetty) हे प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. त्यांनी डेन्मार्कच्या खेळाडूंना मात देत पुढील फेरी गाठली आहे. याशिवाय ध्रुव कपिला आणि एमआर अर्जुन या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने देखील टेरी ही आणि लोह कीन हेन यांच्यावर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
भारताची ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू (PV Sindhu) यंदा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपपूर्वीच दुखापतीमुळे स्पर्धेबाेहर झाली होती. त्यामुळे सायना नेहवाल हिच्यावर अनेकांच्या नजरा होत्या, तिने सुरुवातही दमदार केली. पण त्यानंतर आता प्री-क्वॉर्टरफायनल्समध्ये मात्र तिला थायलंडच्या बी. ओंगबमरुंगफन (B. Ongbamrungphan) हिने 17-21 21-16 13-21 अशा फरकाने पराभूत केलं. त्यामुळे सायनाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
BWF World Championships 2022: Prannoy HS advances into QFs, Saina Nehwal crashes out
— ANI Digital (@ani_digital) August 25, 2022
Read @ANI Story | https://t.co/xzcqa0hGZP#BWFWorldChampionships2022 #PrannoyHS #badminton #SainaNehwal pic.twitter.com/2xuLbwD947
पुरुष दुहेरीत भारताची कमाल कामगिरी
सायना जरी पराभूत झाली असली तरी भारताच्या पुरुष दुहेरी जोडीने चांगली कामगिरी करत उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे. यामध्ये सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी डेन्मार्कच्या जे. बे आणि एल. मॉलहेड (J. bay, Lasse Mølhede) या जोडीला 21-10 आणि 21-12 अशा सोप्या फरकाने मात देत क्वॉर्टर-फायनल गाठली आहे. दुसरीकडे ध्रुव कपिला आणि एमआर अर्जुन या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने सिंगापूरत्या टेरी ही आणि लोह कीन हेन यांच्यावर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 21-18, 15-21,16-21 अशा तीन सेट्समध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.
लक्ष्य सेनचा विरुद्ध एच.एस. प्रणॉय सामना रंगणार
पुरुष एकेरीमध्ये भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि एचएस प्रणॉय (HS Pranoy) यांनी राऊंड ऑफ 16 मध्ये एन्ट्री मिळवली आहे. दरम्यान स्पर्धेचे ड्रॉ ज्याप्रमाणे लागले आहेत, त्यानुसार दोघेही एकमेंकाविरुद्ध आता राऊंड ऑफ 16 चा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. त्यामुळे कोणतातरी एक भारतीय खेळाडू हा उपांत्य पूर्व फेरीत पोहोचणार आहे.
महिला दुहेरीतही पराभव
दुसरीकडे त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला दुहेरीच्या जोडीलाही पराभव पत्करावा लागला. त्यांना मलेशियाच्या पर्ली टॅन (Pearly tan) थिनाह मुरलीधरन (thinaah muralitharan) या जोडीने 8-21 आणि 17-21 च्या फरकाने पराभूत केलं.
हे देखील वाचा-