Commonwealth Games 2022 : निखत आणि लवलिनानं पहिल्या फेरीत सोपं आव्हान, वाचा कोणाशी होणार सामना?
Lovlina Borgohain Match : बहुप्रतिक्षित कॉमनवेल्थ गेम्सना सुरुवात झाली असून भारताकडून बॉक्सिंगमध्ये महिला बॉक्सर लवलिना आणि निखत रिंगमध्ये उतरणार आहेत.
Nikhat Zareen and Lovlina Borgohain : 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) रंगणार असून भारताचे 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडू विविध अशा 15 खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. अशामध्ये बॉक्सिंग खेळामध्ये भारताला पदक मिळण्याची मोठी शक्यता आहे. यावेळी दुखापतीमुळे अनुभवी बॉक्सर मेरी कोम यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्सला मुकणार असली तरी युवा बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बॉक्सर निखत जरीन (Nikhat Zareen) यांनी मात्र स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे. दरम्यान पहिल्या फेरीत दोघींना सोपं आव्हान मिळालं आहे.
यावेळी निखतसमोर 48-50 किलो लाईट वेट गटात मोज्बाविकच्या (Mozambique) हेलेना इसमाइल बागाओ (Helena Ismael Bagao) हिचं आव्हान असणार आहे. दुसरीकडे 66-70 किलो गटात लवलिनासमोर न्यूझीलंडच्या एरियन निकोल्सनचं (Ariane Nicholson) आव्हान असणार आहे. स्पर्धेतील सर्व सामन्यांच लाईव्ह ब्रॉडकास्ट सोनी पिक्चर्स नेटवर्क (Sony TV) वर केलं जाणार आहे. त्यामुळे भारतीय दर्शक Commonwealth Games 2022 चं लाईव्ह ब्रॉडकास्ट Sony TEN 1, Sony TEN 2, Sony TEN 3, Sony SIX आणि Sony TEN 4 चॅनलवर पाहू शकतात. याशिवाय कॉमनवेल्थ खेळांचं मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग Sony Liv या अॅपवर होणार आहे.
लवलिनासह निखतची स्पर्धेसाठी निवड
भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) पायाला दुखापत झाल्यामुळे 48 किलो कॅटेगरीसाठीच्या ट्रायल्समधून माघार घेतली. ज्यानंतर आता लवलिना आणि निखतची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पात्रता सामन्यांत निखतने 50 किलो वजनी गटात हरयाणाच्या मिनाक्षीला 7-0 ने मात देत विजय मिळवला. तर दुसरीकडे लवलिनाने रेल्वेकडून खेळणाऱ्या पुजाविरुद्ध दमदार विजय मिळवत कॉमनवेल्थ गेम्सचं तिकीट मिळवलं.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिला कॉमनवेल्थ सर करण्यासाठी सज्ज, कसं आहे वेळापत्रक, वाचा सविस्तर!
- Chess Olympiad 2022 : आजपासून सुरु होणार बुद्धिबळ ऑलिम्पियाड; कुठे पाहाल सामने? कसं आहे वेळापत्रक?
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार