India Women vs Australia Women : टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवत इतिहास रचला; तब्बल एका दशकानंतर कांगारुंचा दारुण पराभव
India Women vs Australia Women : या विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला कसोटी विजय आहे. ऑस्ट्रेलियाने 10 वर्षात प्रथम पराभव स्वीकारला आहे.
India Women vs Australia Women : महिला क्रिकेटमध्ये, मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला कसोटी विजय आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा आणि दुसऱ्या डावात 261 धावा केल्या.
Wankhede crowd 👏
— Johns. (@CricCrazyJohns) December 24, 2023
They came, they cheered, they roared for Indian Women's team. The best fans in India. pic.twitter.com/Plf92s8G56
प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात अवघ्या 75 धावांचे टार्गेट 2 गडी गमावून पूर्ण केले. स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली.
Defeated England by 347 runs.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 24, 2023
Defeated Australia by 8 wickets.
- Two massive victories for India in Tests, they deserve to play more Test matches. pic.twitter.com/JtpV4HmuXd
पहिल्या डावात 219 धावा करून ऑस्ट्रेलियन संघ गडगडला. पहिल्या डावात ताहिलाने अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात 261 धावा करून ऑस्ट्रेलियन संघ गडगडला. ताहिलाने दुसऱ्या डावातही 177 चेंडूंचा सामना करत 73 धावा केल्या. या कालावधीत 10 चौकार मारले. संघासाठी एलिस पेरीने 45 धावांचे योगदान दिले.
INDIA DEFEATED AUSTRALIA IN A TEST MATCH...!!!! 🇮🇳 pic.twitter.com/SW3Bwcc2r2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 24, 2023
भारताकडून पूजा वस्त्राकरने पहिल्या डावात 4 बळी घेतले. तिने 16 षटकात 53 धावा दिल्या. तर स्नेह राणाने 22.4 षटकात 56 धावा देत 3 बळी घेतले. दीप्ती शर्माने 2 बळी घेतले. स्नेहने दुसऱ्या डावात 4 बळी घेतले. तिने 22 षटकात 63 धावा दिल्या. राजेश्वर गायकवाड आणि हरमनप्रीतनेही प्रत्येकी दोन गडी बाद केले. पूजाला एक विकेट मिळाली.
INDIA DEFEATED AUSTRALIA IN A TEST MATCH...!!!! 🇮🇳 pic.twitter.com/SW3Bwcc2r2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 24, 2023
इतर महत्वाच्या बातम्या