एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजकोट कसोटीत भारताचा एक डाव आणि 272 धावांनी विजय
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 181 धावांवर आटोपला होता. तर दुसऱ्या डावातही 196 धावांवरच विंडीजचा डाव आटोपला. त्यामुळे भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला.
राजकोट (गुजरात): विराट कोहलीच्या टीम इंडियाने राजकोट कसोटीत वेस्ट इंडिजचा तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 272 धावांनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या कसोटीत टीम इंडियाने पहिल्या डावात 468 धावांची आघाडी घेऊन, विंडीजवर फॉलोऑन लादला होता. भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा पहिल्या डावात अवघ्या 181 धावांत खुर्दा उडवला. विंडीजचा दुसरा डाव केवळ 196 धावांत गडगडला.
भारताच्या रवीचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 37 धावांत चार विकेट्स घेतल्या होत्या. कुलदीप यादवने पाच विकेट्स घेऊन विंडीजचा दुसरा डाव गुंडाळला.
वेस्ट इंडिजने आज सहा बाद 94 धावांवरुन तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. चेस आणि पॉल यांनी आज संयमाने फलंदाजी केली. खराब चेंडू सीमापार धाडत धावसंख्या 147 वर पोहोचवली. मात्र उमेश यादवने अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या पॉलला 47 धावांवर बाद करुन भारताला सातवं यश मिळवून दिलं. मग 159 धावसंख्या असताना अश्विनने 53 धावांवर चेसचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आल्या आल्याच लेविसलाही शून्यावर त्रिफळाचित करत अश्विनने विंडीजला नववा धक्का दिला. त्यानंतर तळाचा फलंदाज गॅबरीलला रिषभ पंतने यष्टिचीत केल्याने विंडीजवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ
भारत दौऱ्यावर आलेला वेस्ट इंडिजचा संघ राजकोटच्या पहिल्याच कसोटीत फॉलोऑनच्या संकटात सापडला आहे. या कसोटीत टीम इंडियानं टीम इंडियानं पहिल्या डावात नऊ बाद 649 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी विंडीजची दुसऱ्या दिवसअखेर सहा बाद 94 अशी दाणादाण उडवली. त्यामुळं भारताच्या हाताशी अजूनही 555 धावांची आघाडी आहे. मोहम्मद शमीने सलामीच्या क्रेग ब्रॅथवेट आणि कायरन पॉवेलचा काटा काढला. मग अश्विन, जाडेजा आणि कुलदीप यादवने एकेक विकेट घेऊन आपल्या फिरकीची जादू दाखवली. शिमरॉन हेटमायर धावचीत झाला.
त्याआधी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. कर्णधार विराट कोहलीपाठोपाठ रवींद्र जाडेजानंही या कसोटीत शतक ठोकलं. विराटनं कसोटी क्रिकेटमधलं चोविसावं, तर जाडेजाने पहिलं शतक झळकावलं. त्यामुळे टीम इंडियाला नऊ बाद 649 धावांवर आपला पहिला डाव घोषित करता आला.
या कसोटीत भारताच्या रिषभ पंतचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं. त्याने विराटच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीत पंतचा वाटा 92 धावांचा होता. त्याने आठ चौकार आणि चार षटकारांची उधळण केली. विराटने दहा चौकारांसह 139 धावांची खेळी उभारली. रवींद्र जाडेजाने पाच चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement