एक्स्प्लोर
पाचव्या वनडेत टीम इंडियाकडून विंडीजचा धुव्वा, मालिका खिशात
रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची अभेद्य भागीदारी साकारत भारताला विजयाचा पल्ला गाठून दिला.
तिरुअनंतपुरम : टीम इंडियाने तिरुअनंतपुरमच्या पाचव्या आणि अखेरच्या वन डेत वेस्ट इंडिजचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने ही मालिका 3-1 अशी खिशात घातली.
विंडीजने दिलेलं 105 धावांचं आव्हान टीम इंडियाने अवघ्या 14.5 षटकांत पार केलं. रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची अभेद्य भागीदारी साकारत भारताला विजयाचा पल्ला गाठून दिला.
रोहितने 56 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 63 धावांची खेळी उभारली. तर विराटने नाबाद 33 धावांचं योगदान दिलं.
त्याआधी टीम इंडियाच्या प्रभावी माऱ्यासमोर विंडीजच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं. 31.5 षटकांत विंडीजचा डाव अवघ्या 104 धावांत संपुष्टात आला.
भारताकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. खलील अहमद आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी दोन विकेट्स घेत त्याला सुरेख साथ दिली. तर भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी एक विकेट घेतली. विंडीजच्या आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement