India vs Sri lanka: सूर्या-रिंकूची जोडी सुपरडुपर हिट; सामन्यात रंगला सुपरओव्हरचा थरार, फक्त एक चौकार अन् विषयच खल्लास; श्रीलंकेला घरच्या मैदानावर नमवलं
India vs Sri lanka: श्रीलंकेसोबतच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियानं पहिला सामना अवघ्या 43 धावांनी जिंकला होता. त्यानंतर त्यांनी दुसरा सामना 7 विकेट्सनी जिंकून मालिकेवर कब्जा केला. आणि काल खेळवण्यात आलेल्या तिसरा सामना जिंकून टीम इंडियानं श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला.
India vs Sri lanka 3rd T20 Match Highlights: सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) श्रीलंका (Sri Lanka) दौऱ्यावर धमाकेदार कामगिरी केली. घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेला टीम इंडियानं क्लीन स्वीप दिला. पल्लेकेले येथे मंगळवारी (30 जुलै) खेळवण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात अतिशय रोमहर्षक लढतील टीम इंडियानं धमाकेदार खेळी करत श्रीलंकेला नमवलं. खरं तर शेवटचा सामना अत्यंत अटीतटीचा झाला आणि बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळाला. सुपर ओव्हरमध्ये तर टीम इंडियानं जे काही केलं, ते डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं.
3⃣-0⃣ 🙌@Sundarwashi5 with a 'super' over and Captain @surya_14kumar with the winning runs! 😎
— BCCI (@BCCI) July 30, 2024
Scorecard ▶️ https://t.co/UYBWDRh1op#SLvIND pic.twitter.com/KoNf4OFJHq
श्रीलंकेसोबतच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियानं पहिला सामना अवघ्या 43 धावांनी जिंकला होता. त्यानंतर त्यांनी दुसरा सामना 7 विकेट्सनी जिंकून मालिकेवर कब्जा केला. आणि काल खेळवण्यात आलेल्या तिसरा सामना जिंकून टीम इंडियानं श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. तिसऱ्या सामन्याच्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय क्रिकेट संघाला 3 धावांचं लक्ष्य मिळालं. महिष तिक्षीनाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सूर्यानं सामना जिंकला.
टीम इंडियासाठी सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टनची दमदार कामगिरी (3 धावांचं लक्ष्य)
पहिला चेंडू : वाइड
दुसरा चेंडू : कुसल मेंडिसनं 1 धाव घेतली
तिसरा चेंडू : कुसल परेरा झेलबाद
चौथा चेंडू : कुसल मेंडिस झेलबाद
रिंकू-सूर्याची बॉलिंग, 2 ओव्हर्समध्ये 2-2 विकेट्स
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील शेवटचा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघानं नाणेफेक गमावली आणि सर्वात आधी फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. टीम इंडियानं 137 धावांचं लक्ष्य ठेवलं. टीम इंजियाच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघानं 8 गडी गमावून 137 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. कुसल परेराने 46 आणि कुसल मेंडिसने 43 धावांची खेळी केली. तर पथुम निसांकानं 26 धावा केल्या.
रिंकू सिंहंनं भारतीय क्रिकेट संघासाठी 19वे षटक टाकलं, ज्यात त्यानं 2 विकेट्स घेतले. त्यानंतर शेवटच्या षटकात श्रीलंकेला 6 धावांची गरज असताना सूर्या स्वतः गोलंदाजीसाठी आला. या ओव्हरमध्ये त्यानं 2 बळी घेत फक्त 5 धावा दिल्या आणि पराभवाचा सामना बरोबरीत सोडवला.
असा रंगला सुपर ओव्हरचा थरार
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि कुशल परेरा फलंदाजीसाठी आले होते. भारताकडून गोलंदाजीसाठी वॉशिंग्टन सुंदरवर जबाबदारी सोपवण्यात आली. सुंदरनं पहिला बॉल वाईड टाकला. कुशल मेंडिसनं पुढच्या बॉलवर एक रन दिली. यानंतर दुसऱ्या बॉलवर कुशल परेरा 1 रन करुन बाद झाला. परेराचा कॅच रवि बिश्नोईनं घेतला. यानंतर निसांका फलंदाजीसाठी आला त्यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलिंगवर रिंकू सिंगनं कॅच घेतला. यामुळं श्रीलंका 2 धावांवर बाद झाली. वॉशिंग्टन सुंदरनं सूर्यकुमार यादवनं सोपवलेली जबाबदारी पार पाडली.
यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी तीन धावांची गरज होती. सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी तीन धावांची गरज असताना कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि उपकॅप्टन शुभमन गिल फलंदाजीसाठी हे दोघे फलंदाजीसाठी आले. सूर्यकुमार यादवनं पहिल्याच बॉलवर चौकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला.
टीम इंडिया-श्रीलंका हेड टू हेड
एकूण टी20 सामने : 32
टीम इंडियाचा विजय : 22
श्रीलंकेचा विजय : 9
अनिर्णित : 1
श्रीलंकेच्या घरच्या मैदानावरील रेकॉर्ड
एकूण टी20 सामने : 11
टीम इंडियाचा विजय : 8
श्रीलंकेचा विजय : 3
टीम इंडियात श्रीलंकेच्या विरोधात रेकॉर्ड
एकूण टी20 सामने : 17
टीम इंडियाचा विजय : 13
श्रीलंकेचा विजय : 3
अनिर्णित : 1