एक्स्प्लोर
क्रिकेट माझ्या रक्तात, लग्नानंतर पहिल्या मॅचबाबत विराटचं उत्तर
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरोधात तीन कसोटी मालिका, सहा वनडे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे.
मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहे. क्रिकेट माझ्या रक्तातच आहे, असं सांगत विराटने कमबॅकविषयीचा प्रश्नावर षटकार ठोकला. 5 जानेवारीला कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतासाठी जिकीरीची मानली जात आहे. मात्र कर्णधार कोहली मालिकेसाठी सज्ज आहे. लग्नसोहळा हा आयुष्यातला सुंदर काळ होता. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ट्रेनिंग सुरु असल्याचं कोहली म्हणाला.
मी एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी क्रिकेटपासून दूर राहिलो, पण पुन्हा क्रिकेटकडे परतणं अजिबात कठीण नाही, शेवटी क्रिकेट माझ्या नसानसात भिनलं आहे, असं विराट म्हणतो.
विराट-अनुष्काच्या ग्रॅण्ड रिसेप्शनचा खास व्हिडीओ
'परदेशात जिंकण्यासाठी तुम्हाला दीर्घ काळापासून क्रिकेट खेळत राहावं लागतं. गेल्या वेळी आम्ही जे करु शकलो नाही, ते यावेळी करायचं आहे.' असा निर्धारही विराटने व्यक्त केला. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरोधात तीन कसोटी मालिका, सहा वनडे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. विराट-अनुष्का दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत. विराट सामन्यांची तयारी करणार आहे, तर अनुष्का त्याच्यासोबत नववर्षाचं स्वागत करेल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अनुष्का मुंबईला परत येणार आहे. शाहरुखसोबतच्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरु होणार आहे.मुंबईत विरुष्काचं ग्लॅमरस रिसेप्शन
विराट कोहली आणि बॉलिवूडची लीडिंग लेडी अनुष्का शर्मा या नवदाम्पत्याच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन मुंबईच्या सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलं. विराटने जोधपुरी स्टाईलचा व्हेल्वेट सूट, तर अनुष्कानं सोनेरी वेलबुट्टीचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. पंजाबी संस्कृतीनुसार परिधान केलेला लाल चूडाही अनुष्काच्या हातात उठून दिसत होता. विरानुष्काच्या या रिसेप्शनला क्रीडा आणि चित्रपटसृष्टीतले अनेक तारेतारका उपस्थित होते. त्या दोघांचा लग्नसोहळा 11 डिसेंबरला इटलीच्या सिएना प्रांतातल्या ब्युऑनकॉनव्हेन्टो शहरात संपन्न झाला. त्यानंतर 21 डिसेंबरला विरानुष्काच्या लग्नाचं पहिलं रिसेप्शन दिल्लीत पार पडलं होतं.संबंधित बातम्या :
अनुष्का शर्माने केलेलं ट्विट ठरलं यंदाचं गोल्डन ट्विट
मुंबईत आज 'विरुष्का'चं ग्रॅण्ड रिसेप्शन, 300 पाहुणे हजेरी लावणार!विराट-अनुष्काच्या रिसेप्शनला पंतप्रधान मोदींची हजेरी
VIDEO: तोंडात नोट पकडून अनुष्काचा डान्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement