एक्स्प्लोर
न्यूझीलंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड
न्यूझीलंड विरोधातील तीन एक दिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून, शिखर धवनची भारतीय संघात वापसी झाली आहे.
मुंबई : न्यूझीलंड विरोधातील तीन एक दिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून, शिखर धवनची भारतीय संघात वापसी झाली आहे. मात्र, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाला संघातून डच्चू देण्यात आला आहे.
येत्या 22, 25 आणि 29 ऑक्टोबर दरम्यान, भारत दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंड विरोधातील तीन एक दिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली. या संघात शिखर धवनची वापसी झाली आहे. तर आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा सारख्या खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, दिनेश कार्तिक आणि शार्दुल ठाकूरचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
आज जाहीर झालेल्या संघात कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आदींचा समावेश करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement