India Vs New Zealand World Cup Semi Final : 2019 मधील तोच संघ, तोच थरार अन् तोच सेमीफायनलचा महामुकाबला; टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत भिडणार!
भारतीय संघाला आता न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. हा तोच संघ आहे, ज्यांनी विश्वचषक 2019 च्या मँचेस्टर उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला होता.
कोलकाता : 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील टॉप-4 संघ निश्चित करण्यात आले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand World Cup Semi Final in mumbai) हे बलाढ्य उपांत्य फेरीतील संघ आहेत. पाकिस्तानही उपांत्य फेरीच्या शर्यतीत होते, पण कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ते औपचारिकरित्या बाहेर पडले. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ आता थेट मायदेशी परतणार आहे.
The Semi Finalists are confirmed...!!!! pic.twitter.com/N2zhikweSp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 11, 2023
या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता न्यूझीलंड आव्हानाला सामोरे जावे लागेल. हा तोच संघ आहे, ज्याने विश्वचषक 2019 च्या मँचेस्टर उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला होता. आयसीसी स्पर्धेतील दोन्ही संघांमध्ये जुने वैर आहे.
2007 WC: Qualified into Semi-Final
— Johns. (@CricCrazyJohns) November 11, 2023
2011 WC: Qualified into Semi-Final
2015 WC: Qualified into Final
2019 WC: Qualified into Final
2023 WC: Qualified into Semi-Final*
One of the most consistent team in World Cup history - New Zealand. pic.twitter.com/F1kLCXB0iO
अशा स्थितीत रोहितकडे मागील उपांत्य फेरीचा बदला घेण्याची मोठी संधी असेल. यावेळी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हे देखील रोहितचे होम ग्राउंड आहे. याच विश्वचषकात भारताने श्रीलंकेला 55 धावांत गुंडाळून 302 धावांनी सामना जिंकला होता.
INDIA vs NEW ZEALAND AT WANKHEDE IN SEMIS.....!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) November 11, 2023
- Can't wait for November 15th. pic.twitter.com/6Au3h7OIkT
यानंतर दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे. तर आफ्रिकेचे हात नेहमीच रिकामे राहिले आहेत. त्यांना नेहमीच चोकर्सचा शिक्का बसला आहे.
आफ्रिका संघाने अनेकवेळा चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, पण इथे ती चोकर असल्याचे सिद्ध होते आणि हरल्यानंतर बाहेर पडते. मात्र, यावेळी टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिले विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने खेळत आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या