एक्स्प्लोर
न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत परत, हार्दिक पंड्याला तिसरी विकेट
न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत परत, हार्दिक पंड्याला तिसरी विकेट
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला वनडे सामना : नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
धर्मशाला : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळवलेल्या निर्भेळ यशानं टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला असून, आता पाच वन डे सामन्यांच्या आगामी मालिकेवरही निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.
भारत आणि न्यूझीलंडमधल्या या मालिकेतला सलामीचा सामना धर्मशालामध्ये खेळवण्यात येईल. विराट कोहलीच्या टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असा विजय मिळवून आयसीसीच्या क्रमवारीत भारताला अव्वल स्थान मिळवून दिलं. आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालीही आयसीसीच्या वन डे सामन्यांच्या क्रमवारीत एक पाऊल पुढे टाकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
टीम इंडियानं पाच वन डे सामन्यांची ही मालिका 4-1 अशी जिंकली, तर आयसीसीच्या क्रमवारीत भारताला चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर दाखल होता येईल. आयसीसीच्या वन डे क्रमवारीत सध्या न्यूझीलंड 113 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून, चौथ्या स्थानावरच्या भारताच्या खात्यात 110 गुण आहेत.
टीम इंडियाचं पारडं जड :
भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये भारतात खेळवण्यात आलेल्या वन डे सामन्यांचा इतिहास लक्षात घेतला, तर आगामी मालिकेत टीम इंडियाचं पारडं जड मानलं जात आहे. न्यूझीलंडला भारतात वन डे सामन्यांची मालिका कधीही जिंकता आलेली नाही. भारत दौऱ्यातल्या गेल्या चारही वन डे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
उभय संघांमध्ये आजवर जगभरात खेळवण्यात आलेल्या 93 सामन्यांमध्येही भारताच्या गाठीशी 46 विजय आणि न्यूझीलंडच्या गाठीशी 41 विजय अशी कामगिरी आहे. अर्थात, दोन्ही संघांमधल्या अखेरच्या पाच वन डे सामन्यांमध्ये न्यूझीलंडनं चार विजय मिळवले असून, एक सामना टाय झाला होता.
टीम इंडियात कोण कोण?
कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला महेंद्रसिंग धोनी वन डे सामन्यांच्या निमित्तानं न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा रणांगणात उतरणार आहे. पण वन डे सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियाला रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी या तीन प्रमुख गोलंदाजांची उणीव
नक्कीच जाणवेल.
भारतीय संघासमोर यंदा दीर्घ मोसमाचं आव्हान आहे, हे लक्षात घेऊन अश्विन, जाडेजा आणि शमीला न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे. त्या तिघांच्या अनुपस्थितीत ऑफ स्पिनर जयंत यादव, डावखुरा स्पिनर अक्षर पटेल आणि मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी यांना अंतिम संघात संधी मिळू शकते.
झिम्बाब्वे दौरा आणि अमेरिकेतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठी संधी न मिळालेल्या हार्दिक पंड्यानं या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. अष्टपैलू या नात्यानं पंड्याला अंतिम संघात संधी मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement