(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shreyas Iyer Catch: श्रेयस अय्यरने चक्क जडेजाची काॅपी केली, पण जडेजा कधी नव्हे तो चुकला अन् बायको सुद्धा बघतच राहिली!
Shreyas Iyer Catch: य्यरने घेतलेला झेल अप्रतिम असाच होता. श्रेयस अय्यरने ज्या पद्धतीने झेल टिपला त्या शैलीत तो क्वचित दिसला आहे, पण रवींद्र जडेजाने झेपावत अनेकदा अप्रतिम कॅच घेतले आहेत.
Shreyas Iyer Catch: धरमशालामध्ये खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम झेल घेत श्रेयस अय्यरने थेट पदकाची मागणी केली. याआधी जडेजाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली होती. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि डावाच्या चौथ्या षटकात मोहम्मद सिराजने संघाला पहिले यश मिळवून दिले. किवी सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला श्रेयस अय्यरने झेलबाद केले. कॉनवे 9 चेंडूत खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
View this post on Instagram
अय्यरने घेतलेला झेल अप्रतिम असाच होता. श्रेयस अय्यरने ज्या पद्धतीने झेल टिपला त्या शैलीत तो क्वचित दिसला आहे, पण रवींद्र जडेजाने झेपावत अनेकदा अप्रतिम कॅच घेतले आहेत. त्यामुळे कॅच घेतल्यानंतर आनंदी झालेल्या श्रेयसने क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांकडे हातवारे करत पदकाची मागणी केली. विश्वचषकातील प्रत्येक सामन्यानंतर भारतीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक सर्वोत्तम झेल घेणाऱ्या खेळाडूला पदक देतात. यामुळे अय्यरने झेल घेत लगेच पदकाची मागणी केली. अय्यरच्या पदकाच्या हावभावाचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.
Reaction of Rivaba Jadeja on Ravindra Jadeja's drop catch. pic.twitter.com/9cLQxaVz8C
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
भारतीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप हे व्हिडिओमध्ये दाखवले गेले. यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात जडेजाच्या झेलचा रिप्ले दाखवण्यात आला. या झेलनंतर जडेजाने पदकाच्या मागणीचे संकेत दिले होते. यानंतर अय्यरचा झेल दाखवण्यात आला, जो त्याने आजच्या सामन्यात डेव्हॉन कॉनवेचा घेतला.
Super catch from Shreyas Iyer. pic.twitter.com/Mmb3JCuwv7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
जडेजा कधी नव्हे तो चुकला!
या सामन्यातून वर्ल्डकपमध्ये एन्ट्री केलेल्या मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर विकेट आपली प्रतिभा दाखवून दिली. शमीचे दुसरे षटकही सनसनाटी ठरले. त्याने दुसऱ्या षटकात पहिल्यांदा रचिन रविंद्रला चकवले आणि कॅच आऊट देण्यात आले, पण त्याने क्षणाचाही विलंब न लावता रिव्ह्यू घेतला आणि तो नाबाद ठरला. त्यानंतर याच षटकात अत्यंत सोपा कॅच चित्त्याप्रमाणे झेपावणाऱ्या जडेजाच्या हातातून सूटला. त्याचा सुटलेला झेल पाहून मैदानात असलेली पत्नी सुद्धा पाहतच राहिली. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बरंच काही सांगून गेले.
View this post on Instagram
टीम इंडिया सलग पाचव्या सामन्यात धावांचा पाठलाग करणार
टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. संघाने सर्व सामने धावांचा पाठलाग करून जिंकले आहेत. अशा परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यातही रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने, अफगाणिस्तानचा 8 विकेट्सने, पाकिस्तानचा 7 विकेट्सने आणि बांगलादेशचा 7 विकेट्सनी पराभव केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या