IND vs NZ 2nd T20: आज भारत-न्यूझीलंडमधील दुसरा टी20 सामना, मालिका विजयाच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात
India vs New Zealand 2nd T20: भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरु असलेल्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील सामना आज खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियानं बाजी मारत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
India vs New Zealand 2nd T20: भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरु असलेल्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज रांचीमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियानं बाजी मारत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशात आज रोहितच्या नेतृत्वात मालिका विजयाच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे किवी टीम मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. रांचीमधील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे.
हेड टू हेड
टी20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा संघ टीम इंडियावर वरचढ ठरला आहे. दोन्ही संघांनी आमनेसामने 18 सामने खेळले आहेत. त्यापैकी 9 सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत तर भारताने सात सामने जिंकले आहेत.
पाच वर्षात टीम इंडियानं जिंकल्या आहेत 10 मालिका
2016 सालापासून भारतीय संघानं आपल्या भूमीत मागील 11 टी20 इंटरनॅशनल मालिकेतील 10 मालिका जिंकल्या आहेत. सोबतच मागील सलग चार मालिका टीम इंडियानं जिंकल्या आहेत.
पिच रिपोर्ट
जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्सची पिच फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीसाठी अनुकुल आहे. यामुळं आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. या पिचवरील अॅव्हरेज स्कोर 152 आहे. दरम्यान आजचा सामना हाय स्कोरिंग होण्याची शक्यता आहे. रांचीच्या या स्टेडिअमवर आतापर्यंत दोन टी 20 आंतराराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी एक सामना पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाने तर दुसरा सामना पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं जिंकला आहे. या मैदानावर सर्वाधिक स्कोर टीम इंडियानं 196 धावांचा उभारला होता.
भारताची संभावित प्लेईंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडची संभावित प्लेईंग इलेव्हन- मार्टिन गप्टिल, डेरिल मिशेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, टिम सीफर्ट, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), टॉड एस्टल, लॉकी फर्ग्यूसन आणि ट्रेंट बोल्ट.