KL Rahul : ऑस्ट्रेलियाविरुद्ध हुकलं, पण नेदरलँडविरुद्ध बाजी मारली; लोकल बाॅय लोकेश राहुलचं वर्ल्डकपमधील भारतासाठी सर्वात वेगवान शतक!
दुखापतीतून पुनरागमन केलेल्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी दिवाळीत नेदरलँड्सविरुद्ध खेळणाऱ्या टीम इंडियासाठी झंझावाती शतके झळकावली.
बंगळूर : आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाने आपला स्फोटक खेळ सुरू ठेवला आहे. सलग 8 सामन्यात दमदार विजय संपादन केल्यानंतर 9व्या सामन्यातही दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी दिवाळीत नेदरलँड्सविरुद्ध खेळणाऱ्या टीम इंडियासाठी झंझावाती शतके झळकावली. टीम इंडियाने 50 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 410 धावांचा डोंगर उभा केला.
Virat Kohli - 594 runs.
— Johns. (@CricCrazyJohns) November 12, 2023
Rohit Sharma - 503 runs.
Shreyas Iyer - 421 runs.
KL Rahul - 347 runs.
Gill - 270 runs.
India has the best batting unit in World Cup 2023. pic.twitter.com/XttGoTbXXc
शेवटच्या षटकात केएल राहुलने मारलेल्या दोन षटकारांमुळे शतक पूर्ण झाले. लोकेश राहुलचे (62 चेंडू) वर्ल्डकपच्या इतिहासातील भारतासाठी सर्वात वेगवान शतक आहे. यापूर्वी हाच पराक्रम रोहित शर्माने (63 चेंडू) केला होता. त्याने शेवटच्या षटकात दोन सिक्स ठोकत शतक पूर्ण केले.
KL Rahul created history.
— Johns. (@CricCrazyJohns) November 12, 2023
- He has the most runs by an Indian wicket keeper in a World Cup edition. 🇮🇳 pic.twitter.com/RzfqN4SWdY
दुहेरी षटकारातून केएल राहुलचे शतक
दुखापतीमुळे बराच काळ भारतीय संघाबाहेर राहिल्यानंतर केएल राहुलने जोरदार पुनरागमन केले आहे. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान निर्माण करणाऱ्या या खेळाडूने नेदरलँड्सविरुद्ध झटपट शतक झळकावले. वर्ल्डकपच्या इतिहासातील लोकेश राहुलचे पाचवे वेगवान शतक आहे. विशेष म्हणजे त्याने पाचव्या क्रमांकावरून फलंदाजी करताना शतकी तडाखा दिला.
97* in the first game to back to back sixes to complete hundred in the 9th game of World Cup 2023.
— Johns. (@CricCrazyJohns) November 12, 2023
- This is KL Rahul. 🫡 pic.twitter.com/MNn6WxpfkK
दिवाळीच्या दिवशी भारतीय संघ नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषक सामना खेळण्यासाठी आला होता. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलसोबत त्याने संघाला वेगवान सुरुवात करून दिली. हे दोघेही अर्धशतक झळकावून बाद झाले आणि त्यानंतर विराट कोहलीनेही अर्धशतक केले. आघाडीचे तीन फलंदाज मोठी धावसंख्या बनवू शकले नाहीत पण केएल राहुलने श्रेयस अय्यरसह धमाका केला.
Rahul Dravid and KL Rahul are the only Indian Wicketkeepers to score a hundred in the World Cup history. pic.twitter.com/w8yYCzgbKV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2023
इतर महत्वाच्या बातम्या