KL Rahul : चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असलेल्या केएल राहुलचा दुसरा सर्वात मोठा पराक्रम!
केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या लढतीत 32 धावा केल्यांतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2,500 धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो 23वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
लखनौ : टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या लढतीत 32 धावा केल्यांतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2,500 धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो 23वा भारतीय फलंदाज ठरला आहे. 67व्या एकदिवसीय सामन्याच्या 63व्या डावात त्याने ही कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर आहे. त्याने 463 सामन्यांच्या 452 डावांमध्ये 44.83 च्या सरासरीने 18,426 धावा केल्या. या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर (13,437), सौरव गांगुली तिसऱ्या स्थानावर (11,221), राहुल द्रविड चौथ्या स्थानावर (10,768) आणि महेंद्रसिंग धोनी पाचव्या स्थानावर (10,599) आहे.
KL Rahul is the 2nd fastest to complete 2500 runs in ODIs. (Indian)
— Johns. (@CricCrazyJohns) October 29, 2023
- He batted most of his career as middle order, one of the best ODI players in this generation. pic.twitter.com/z7RBD30fHf
तसेच, रोहित शर्मा (10,500*) 6व्या, मोहम्मद अझरुद्दीन (9,378) 7व्या, युवराज सिंग (8,609) 8व्या, वीरेंद्र सेहवाग 9व्या (7,995) आणि शिखर धवन (6,793) 10व्या स्थानावर आहे. राहुलने आपल्या इनिंगमध्ये 2 धावा करत राहुलने आशियाई भूमीवर 1,500 धावाही पूर्ण केल्या आहेत. या बाबतीत सचिन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 288 सामन्यात 12,067 धावा केल्या होत्या.
या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर (7,982), धोनी तिसऱ्या स्थानावर (6,929), गांगुली चौथ्या स्थानावर (6,302), अझरुद्दीन पाचव्या स्थानावर (6,267), द्रविड सहाव्या स्थानावर, रोहित (6,127- 6,127) आहे. ), युवराज 7व्या स्थानावर (5,683), सेहवाग (5,644) 8व्या आणि गौतम गंभीर (3,974) 9व्या स्थानावर आहे.
Well played, KL Rahul.
— Johns. (@CricCrazyJohns) October 29, 2023
39 runs from 58 balls when India lost 3 quick wickets, a trust worthy innings on tough pitch. pic.twitter.com/cS1FyY6i6z
5व्या क्रमांकावर केएल राहुलच्या 1000 धावा
या सामन्यात 16वी धाव करताच राहुलने वनडेत 5व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 1000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो 7वा भारतीय फलंदाज ठरला आहे. वनडेमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज माजी कर्णधार धोनी (3169) आहे.
या यादीत युवराज (3,040) दुसऱ्या, द्रविड (2,455) तिसऱ्या, सुरेश रैना चौथ्या (2,448), अझरुद्दीन पाचव्या (2,108) आणि अजय जडेजा सहाव्या (1,496) स्थानावर आहे.
केएल राहुलची वनडेतील कामगिरी
राहुलने आतापर्यंत खेळलेल्या 67 एकदिवसीय सामन्यांच्या 63 डावांमध्ये 50.14 च्या सरासरीने आणि 86.90 च्या स्ट्राइक रेटने 2,507 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्येही त्याने 6 शतके झळकावली आहेत. 112 ही त्याची वनडेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या