(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs England : वर्ल्डकपमध्ये प्रथमच टीम इंडियाची पहिल्यांदा बॅटिंग, आता टीम इंडिया गेल्या 20 वर्षांतील इतिहास पुसून काढणार का?
रोहित सेनेने आतापर्यंत 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत. आज टीम इंडियाचा सामना सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडशी लखनौच्या एकना स्टेडियमवर होत आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया प्रथमच पहिल्यांदाच फलंदाजी करत आहे.
लखनौ : भारतीय क्रिकेट संघ 2023 च्या विश्वचषकात भलत्याच फाॅर्ममध्ये असल्याने आजपर्यंत कोणीही रोखू शकलेलं नाही. रोहित सेनेने आतापर्यंत 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत. आज टीम इंडियाचा सामना सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडशी लखनौच्या एकना स्टेडियमवर होत आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच फलंदाजी करत आहे.
India are playing with the same XI. pic.twitter.com/7I9Bi2s27f
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 29, 2023
आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती
रोहित शर्मा म्हणाला, आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. यावेळी मला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. ही चांगली खेळपट्टी असून नवीनही आहे. आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. यावेळी आम्ही पूर्वीप्रमाणेच प्लेइंग-11 घेऊन खेळणार आहोत.</p
England have won the toss and they've decided to bowl first. pic.twitter.com/c5XBdUcN1K
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 29, 2023
यावेळी तुम्हाला तिप्पट कर भरावा लागेल
दरम्यान, या मोठ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने इंग्लंडच्या खेळाडूंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, जो आता व्हायरल होत आहे.
टीम इंडियाचा अनुभवी आणि दिग्गज फलंदाज शिखर धवनने इंग्लंडचे स्टार खेळाडू जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि ख्रिस वोक्स यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'यावेळी तुम्हाला तिप्पट कर भरावा लागेल'. बेअरस्टो, करन आणि लिव्हिंगस्टोन हे शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतात. धवनने इंग्लंडच्या खेळाडूंना अप्रतिम क्लास दिला आहे. भारताने गेल्या दोन दशकात इंग्लंडविरोधात एकही सामना जिंकलेला नाही. पण यावेळी न्यूझीलंडप्रमाणे भारतही इंग्लंडविरोधातही टिच्चून कामगिरी करेल, यात शंका नाही.
India in this World Cup:
— Johns. (@CricCrazyJohns) October 29, 2023
1st match - Chasing.
2nd match - Chasing.
3rd match - Chasing.
4th match - Chasing.
5th match - Chasing.
6th match - Batting first. pic.twitter.com/BQdxJ6xVp6
शिखर धवनबद्दल बोलायचे झाले तर धवनला भारतीय क्रिकेट संघातून वगळण्यात आले होते. गेल्या डिसेंबरपासून तो भारताकडून क्रिकेट खेळलेला नाही. आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली नव्हती, त्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले होते.
भारतीय संघात शिखर धवनचे मोलाचे योगदान
शिखर धवनने भारतासाठी आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2315 धावा, एकदिवसीय सामन्यात 6793 धावा आणि T20 मध्ये 1759 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 शतके आणि 55 अर्धशतके केली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या