India vs England, 4th Test Live : सलग दोन चेंडूवर जडेजा आणि सरफराज खान बाद झाल्याने टीम इंडिया सपशेल बॅकफूटवर
India vs England, 4th Test Live : उपहारानंतर टीम इंडियाच्या डावाला सुरुवात झाली. यानंतर पुन्हा जडेजा आणि सरफराज लागोपाठ बाद झाल्याने टीम इंडियाची अवस्था 5 बाद 120 झाली आहे.
India vs England, 4th Test Live : टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी इंग्लंडला दुसऱ्या डावात गुंडाळून चौथ्या कसोटीत शानदार वापसी केली होती. यानंतर विजयासाठी 192 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या टीम इंडियाने बिनबाद 84 धावांची सलामी दिली होती. मात्र, त्यानंतर पाच विकेट गमावल्याने टीम इंडिया पुन्हा सपशेल बॅकफूटवर गेली आहे. टीम इंडियाची मदार आता गिल आणि ध्रुव जुरेलवर असेल.
Jadeja dismissed for 4.
— Johns. (@CricCrazyJohns) February 26, 2024
- India in big big trouble with 120 for 4. pic.twitter.com/b7aeN6LzgF
यशस्वी जैस्वाल 37 धावांवर बाद झाला. यानंतर कॅप्टन रोहित शर्माही 55 धावा करून बाद झाला. यानंतर रजत पाटीदार पुन्हा अपयशी ठरल्याने टीम इंडियाची अवस्था 3 बाद 100 अशी झाली. त्यामुळे उपहारापूर्वी टीम इंडियाने 3 बाद 118 अशी मजल मारली होती. उपहारानंतर टीम इंडियाच्या डावाला सुरुवात झाली.
Well played, Rohit Sharma!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 26, 2024
A captain's hand in the 4th innings run chase of 192. 55 (81) with 5 fours and a six. He was looking for a great flow, well done Hitman. pic.twitter.com/ybAuZlcIzj
यानंतर पुन्हा जडेजा आणि सरफराज लागोपाठ बाद झाल्याने टीम इंडियाची अवस्था 5 बाद 120 झाली आहे. टीम इंडियाने हे वृत्त लिहिण्यावेळी 5 बाद 134 अशी मजल मारली असून शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल मैदानात आहेत.
Sarfaraz Khan dismissed for a golden duck. pic.twitter.com/BQCSqmcVdX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 26, 2024
आश्विन आणि कुलदीपच्या फिरकीने टीम इंडियाने बाजी पलटली
दुसरीकडे, दुसऱ्या दिवशी बॅकफूटवर गेलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी अश्विन आणि कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर बाजी पलटली. इंग्लंडचा दुसरा डाव दोघांनी अवघ्या 145 धावांमध्ये गुंडाळला. तत्पूर्वी, ध्रुव जुरेलने केलेल्या 90 धावांच्या खेळीमुळे पहिल्या डावात टीम इंडियाला त्रिशतकी मजल मारता आली. त्याला कुलदीप यादवने संयमी साथ दिली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या होत्या.
Well played Jaiswal ⭐ 73 runs in first innings & 37 runs in second innings.
— Johns. (@CricCrazyJohns) February 26, 2024
- Jaiswal has given a great start for India along with Rohit in the chase. pic.twitter.com/LvEPNEpDcF
इतर महत्वाच्या बातम्या