India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय
टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला.
India vs England, 3rd Test : यशस्वी जैस्वालच्या शानदार द्विशतकानंतर गोलंदाज रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीच्या जोरावर भारताने राजकोट कसोटीत इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम केला.
राजकोट कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात रवींद्र जडेजाने षटकात धावा देऊन भारताचे 5 बळी घेतले. याशिवाय कुलदीप यादवनेही 2 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अश्विननेही प्रत्येकी एक विकेट घेतली.
रोहितचा अनोखा पराक्रम
कॅप्टन रोहित शर्माने पहिल्या डावात निर्णायक शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीने वेगळाच योगायोग घडला. त्याने मागील 11 कसोटीत जेव्हा जेव्हा शतकी खेळी केली आहे तेव्हा टीम इंडिया विजयी ठरली आहे.
Whenever Rohit Sharma has scored a century, India never lost the Test match.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 18, 2024
- 11th in a row now...!!! 🔥 pic.twitter.com/WhkjgLj4KO
इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत यशस्वी जैस्वालने पाठोपाठ द्विशतके झळकावली. यशस्वीने दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी 214 धावांची दमदार इनिंग खेळली. तिसऱ्या तीन सामन्यात 104 धावा केल्यानंतर यशस्वी निवृत्त झाला होता, मात्र चौथ्या दिवशी शुभमन गिल बाद झाल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीला आला आणि त्याने द्विशतक झळकावले.
India's biggest win in ODIs under Captain Rohit Sharma.
— Johns. (@CricCrazyJohns) February 18, 2024
India's biggest win in Tests under Captain Rohit Sharma.
- Captain, Leader, Legend, Hitman. pic.twitter.com/viwlggNSkv
यशस्वीशिवाय टीम इंडियाच्या दुस-या डावात 91 धावा करून शुभमन गिल बाद झाला. सर्फराज खाननेही 68 धावांची नाबाद खेळी केली. या तिन्ही फलंदाजांच्या दमदार खेळामुळे रोहित शर्माने 4 बाद 430 धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे पहिल्या डावातील 126 धावांच्या आघाडीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर 557 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या इनिंगमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 131 धावांची शानदार खेळी केली. रोहितनंतर रवींद्र जडेजानेही शतक झळकावले. खालच्या फळीत पदार्पण करणाऱ्या सरफराज खानने ६२ धावांची शानदार खेळी खेळली ज्यामुळे भारताने 445 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
इतर महत्वाच्या बातम्या