एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लायनसमोर टीम इंडिया ढासळली, पहिला डाव 189 धावात आटोपला
बंगळुरु: पुण्याच्या पहिल्या कसोटीपाठोपाठ बंगळुरूच्या दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजांचा 'ये रे माझ्या मागल्या' खेळ पाहायला मिळाला. फरक इतकाच की, पुण्यात भारतीय फलंदाजांनी स्टीव्ह ओ'कीफच्या डावखुऱ्या फिरकीसमोर लोटांगण घातलं होतं. बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात भारतीयांनी नॅथन लायनच्या ऑफ स्पिनसमोर मान तुकवली.
नॅथन लायननं 50 धावांत भारताच्या आठ फलंदाजांना माघारी धाडून भारताचा पहिला डाव अवघ्या 189 धावांत गुंडाळला.
टीम इंडियाच्या या पडझडीत सलामीचा लोकेश राहुलनं एक खिंड समर्थपणे लढवली. पण त्याचं शतक दहा धावांनी हुकलं. त्यानं 205 चेंडूंत नऊ चौकारांसह 90 धावांची खेळी उभारली. भारताच्या अन्य दहा फलंदाजांनी मिळून अवघ्या 83 धावाच जमवल्या.
-------------
- LIVE: सलमीवीर लोकेश राहुलचं झुंजार अर्धशतक, 105 चेंडूत 50 धावांची संयमी खेळी
- LIVE: भारताला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली 12 धावांवर बाद, भारत 88/3
- LIVE: भारत वि. ऑस्ट्रेलिया: भारताचा दुसरा गडी बाद, चेतेश्वर पुजारा 17 धावांवर माघारी
- LIVE: भारताला पहिला धक्का, सलामीवीर अभिनव मुकुंद शून्यावर बाद, भारत 11 /1
बंगळुरुमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सलामीवीर मुरली विजय आणि जयंत यादव यांना दुसऱ्यात सामन्यासाठी वगळ्यात आलं आहे. तर त्यांच्याऐवजी अभिनव मुकुंद आणि करुण नायर यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.
---------
पुण्याच्या पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा डंख बसलेली विराट कोहलीची टीम इंडिया आणखी एका कठोर संघर्षाला सज्ज झाली आहे. उभय संघांमधल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरुवात होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाची ती आजवरची सर्वात मोठी परीक्षा ठरावी.
पुण्याच्या कसोटीत तब्बल 333 धावांनी हार स्वीकारण्याआधी, सलग 19 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ अपराजित राहिला होता. पण ऑस्ट्रेलियाचा डावखुरा स्पिनर स्टीव्ह ओ'कीफनं 70 धावांत बारा भारतीय फलंदाजांना माघारी धाडून, पुण्याच्या आखाड्यात टीम इंडियाला लोटांगण घालायला भाग पाडलं. या पार्श्वभूमीवर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे ही जोडी बंगळुरूच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाला कशी प्रेरणा देते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
नॅथन लायन-मिचेल स्टार्क जोडगोळीचं आव्हान
विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांना बंगळुरू कसोटीत डावखुरा स्पिनर स्टीव्ह ओ'कीफच्या कोड्याचं उत्तर शोधावं लागणार आहेच, पण त्याच वेळी ऑफ स्पिनर नॅथन लायन आणि मिचेल स्टार्क-जोश हेझलवूड या वेगवान जोडगोळीचा सामना करण्याचं आव्हानही भारतीय फलंदाजांसमोर आहे.
पुण्याच्या कसोटीत स्टीव्ह ओ'कीफच्या डावखुऱ्या स्पिनला भारतीय फलंदाजांना उत्तर सापडलं नव्हतं. त्यानं दोन्ही डावांमध्ये सहा-सहा विकेट्स काढून भारताला अनुक्रमे 105 आणि 107 धावांत गुंडाळलं. नॅथन लायननं दुसऱ्या डावात चार फलंदाजांना माघारी धाडून त्याला छान साथ दिली. त्याआधी मिचेल स्टार्कनं पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांचा काटा काढून ऑस्ट्रेलियाला त्या कसोटीत झुकतं माप मिळवून दिलं होतं. आता बंगळुरूत भारतीय फलंदाजांवर पुन्हा वर्चस्व गाजवण्यासाठी ऑस्ट्रेलियन चौकडीचे हात शिवशिवत असतील.
टीम इंडियाला पुण्याच्या कसोटीत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची सर्वात मोठी ठेच रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाच्या स्वाभिमानाला बसली असावी. मायदेशातल्या कसोटीत आणि फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर त्या दोघांपेक्षाही सरस कामगिरी ही ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह ओ'कीफ आणि नॅथन लायननं बजावली. किंबहुना त्या दोघांनी ऑस्ट्रेलियाला पहिली कसोटी जिंकूनही दिली. वास्तविक या कसोटीत अश्विन आणि जाडेजा या दोघांनीही प्रयत्नांची शर्थ केली.
भारताच्या क्षेत्ररक्षकांनी त्यांची निराशा केली. भारतीय क्षेत्ररक्षकांनी आपली कामगिरी चोख बजावली असती, तर अश्विन आणि जाडेजाच्या आक्रमणाची धार आणखी वाढली असती. तरीही पुण्याच्या कसोटीत अश्विननं सात आणि जाडेजानं पाच फलंदाजांना माघारी धाडण्यात यश मिळवलं. ही कामगिरी बंगळुरू कसोटीसाठी भारताच्या फिरकी गोलंदाजांची उमेद वाढवणारी ठरावी.
- LIVE: सलामीवर लोकेश राहुलचं शतक हुकलं, 90 धावांवर बाद
भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या दुसऱ्या कसोटीत भारताला सुरुवातीलाच तीन धक्के बसले आहेत. अभिनव मुकुंद शुन्यावर बाद झाल्यानंतर पुजाराही अवघ्या 17 धावांवर परतला. त्यामुळं उपहारापर्यंत भारताची अवस्था 2 बाद 72 अशी झाली होती. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीही फारशी चमक दाखवू शकला नाही. विराट अवघ्या 12 धावा करुन माघारी परतला. सकाळी भारतानं नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतला. पुण्याच्या पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळं दुसऱ्या कसोटी जिंकून बरोबरी साधण्याचा प्रयत्न विराट कोहलीची टीम इंडियाला करावा लागणार आहे.
- LIVE: करुण नायर 26 धावांवर बाद, भारताचा निम्मा संघ तंबूत, भारत 167/5
- LIVE: भारताचा चौथा गडी तंबूत, अजिंक्य रहाणे 17 धावांवर बाद, भारत 130/3
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
राजकारण
Advertisement