एक्स्प्लोर
INDvsAUS : पहिल्या टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 174 धावांचं लक्ष्य
पण डकवर्थ लुईस पद्धतीनुसार टीम इंडियाला विजयासाठी 174 धावांचं लक्ष्य देण्यात आलं आहे.

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या ट्वेन्टी 20 सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी 174 धावांचं आव्हान आहे. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतर ऑस्ट्रेलियाने 17 षटकांत चार बाद 158 धावांची मजल मारली. पण डकवर्थ लुईस पद्धतीनुसार टीम इंडियाला विजयासाठी 174 धावांचं लक्ष्य देण्यात आलं आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिसने चौथ्या विकेटसाठी रचलेली 79 धावांची भागीदारी ऑस्ट्रेलियाच्या डावात मोलाची ठरली. मॅक्सवेलने 24 चेंडूंत चार षटकारांसह 46 धावांची, तर स्टॉयनिसने 19 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह नाबाद 33 धावांची खेळी उभारली. याशिवाय क्रिस लीनने 37 धावा आणि कर्णधार अॅरॉन फिन्चने 27 धावांचं योगदान दिलं. भारताकडून कुलदीप यादवने दोन, तर खलील अहमद आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर कृणाल पांड्या सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने चार षटकात 55 धावा दिल्या, मात्र एकही विकेट काढता आली नाही.
आणखी वाचा























