India vs Afghanistan 2nd T20I Live Streaming And Telecast : रोहित अन् विराट 429 दिवसांनी टी-20 संघात; भारत-अफगाणिस्तान दुसरा T-20 सामना विनामुल्य कधी, कुठे आणि कसा पाहाल?
India vs Afghanistan 2nd T20I Live Streaming And Telecast : आजच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करेल हे जवळपास निश्चित आहे, जो वैयक्तिक कारणांमुळे पहिला टी-20 सामना खेळू शकला नाही.
India vs Afghanistan 2nd T20I Live Streaming And Telecast : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज रविवारी 14 जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यजमान भारताने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला होता. अष्टपैलू शिवम दुबे टीम इंडियाच्या विजयाचा नायक होता. शिवमने पहिल्यांदा गोलंदाजीत 1 बळी घेतला होता आणि त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद 60 धावांची इनिंग खेळली होती.
आजच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करेल हे जवळपास निश्चित आहे, जो वैयक्तिक कारणांमुळे पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही. अशा स्थितीत दुसरा सामनाही खूप रंजक असेल.
Virat Kohli and Rohit Sharma will reunite in the shortest format after 14 long months.pic.twitter.com/lk4mbWByEg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 14, 2024
तुम्हाला दुसरा सामना कधी, कुठे आणि कसा विनामूल्य पाहता येईल?
सामना कधी होणार?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज रविवारी 14 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
कुठे होणार सामना?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
टीव्हीवर लाइव्ह कुठे बघायचे?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा T20 स्पोर्ट्स 18 च्या माध्यमातून भारतात टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल.
लाइव्ह मोफत कुठे बघायचे?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना 'Jio Cinema' वर मोफत लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.
दुसऱ्या T20 साठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, कुलदीप यादव. , आवेश खान.
दुसऱ्या T20 साठी अफगाणिस्तानचा संघ
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबद्दीन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, हजरतुल्ला झाझाई, फरीद अहमद मलिक, शराफुद्दीन अश्रफ, इकराम अलीखिल, कैस अहमद, नूर अहमद, मोहम्मद सलीम साफी.
इतर महत्वाच्या बातम्या