एक्स्प्लोर

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा, शुभमन गिलच्या हाती संघाची धुरा 

बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिलच्या हातात कर्णधार म्हणून संघाची धुरा देण्यात आली आहे.

India Squad Vs Afghanistan ODI Series : देशात सध्या आयपीएलची धामधुम शिगेला पोहोचली आहे. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ऋषभ पंतकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले असून, केएल राहुलला नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचा समावेश

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांना संधी दिली जाणार नसल्याची चर्चा पाहायला मिळत होती. रोहित आणि विराटच्या जागी युवा खेळाडूंना संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र दोघांना संधी देण्यात आली आहे. मात्र रोहित खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रोहित मालिकेआधी फिट होती की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

संघात तीन नवीन खेळाडूंचा समावेश

रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली असून, संघात तीन नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हे तीन नवीन खेळाडू गुरनूर ब्रार, हर्ष दुबे आणि मानव सुथार आहेत. भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना 6 जूनपासून न्यू चंदीगड येथे खेळला जाईल. बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठीही संघाची घोषणा केली आहे. 

 श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची पदाची जबाबदारी

स्पिन बॉलर मानव सुतार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार या दोघांना पहिल्यांदाच कसोटी संघात घेण्यात आले आहे. तर प्रिन्स यादव याला वनडे संघामध्ये स्थान मिळाले असून तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची पदाची जबाबदारी दिली आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या फिटनेसबाबत अजूनही संभ्रम असल्याने त्यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका आहे. यंदाच्या हंगामामध्ये आपल्या बॉलिंगने सर्वांना प्रभावित केलेल्या प्रिन्स यादव याची वन डे टीममध्ये निवड झाली आहे. प्रिन्सने आयपीएलमध्ये 12 सामन्यांमध्ये 16 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. त्यासोबतच पॉवर प्ले, मिडल ओव्हर्स आणि डेथ ओव्हर्समध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. 

वन डे साठी भारतीय संघ : 

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, एस. अय्यर, केएल राहुल, अर्शदीप सिंग, इशान किशन, हार्दिक पांड्या, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, पी. कृष्णा, प्रिन्स यादव, जी. ब्रार , हर्ष दुबे.


अफगाणिस्तानविरुद्धच्या  मालिकेत वन-डे सामने 14, 17 आणि 20 जून रोजी अनुक्रमे धरमशाला, लखनौ आणि चेन्नई येथे होणार आहेत. संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून अंतिम 11 मध्ये कोणाला संधी मिळते आणि त्याचं ते सोनं करण्यात यशस्वी ठरतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget