(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक
Asian Taekwondo Championships : पुमसे या सर्वात आव्हानात्मक गटात पदक जिंकणारी रूपा ठरली पहिली भारतीय खेळाडू, आशियाई पुमसे, क्युरोगीमध्ये भारतीय तायक्वांदो संघ सहभागी
Asian Taekwondo Championships : भारतीय संघाने व्हिएतनाम येथील तायक्वांदो स्पर्धेत इतिहास रचला. रूपाने भारतीय संघासाठी ऐतिहासिक पदकाची कमाई केली. तिने पुमसे या प्रकारात तिसरे स्थान पटकावले यासह भारतीय संघाच्या नावावर पदकाचे खाते उघडले गेले आहे. यातून पहिल्यांदाच भारताने या स्पर्धेमध्ये पदकाचा बहुमान पटकावला. प्रशिक्षक अभिषेक दूबे यांच्यामार्गदर्शनाखाली खेळाडूने ऐतिहासिक यश संपादन केले. वरिष्ठ आशियाई पुमसे आणि क्युरोगी तायक्वांदो स्पर्धेसाठी भारतीय तायक्वांदो संघ सहभागी झाला आहे. व्हिएतनाम येथे ही स्पर्धा 14 ते 18 मे या कालावधीत खेळवली जात आहे. आशियाई पुमसे ही आठवी तर क्युरोगी ही २६वी स्पर्धा आहे. नवी दिल्ली येथून भारतीय तायक्वांदो संघ व्हिएतनामला सोमवारी रवाना झाला.
दा नांग या शहरात आशियाई तायक्वांदो स्पर्धा पाच दिवस स्पर्धा चालणार आहे. इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी भारतीय पुमसे व क्युरोगी हे संघ जाहीर केले आहेत. नामदेव शिरगावकर यांनी पुमसे व क्युरोगी या दोन्ही प्रकारात भारतीय तायक्वांदो संघ लक्षवेधक कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला. याच विश्वासाला सार्थकी लावत खेळाडूने पदकाचे खाते उघडले.
इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षक अभिषेक दुबे यांच्या सर्वोत्तम प्रशिक्षणातून रूपा बायोरने व्हिएतनाम येथे ऐतिहासिक पदकाचा बहुमान पटकावला. अरुणाचल प्रदेश येथील या युवा खेळाडूने पुमसे या सर्वात आव्हानात्मक गटात भारताला कांस्यपदकचा बहुमान मिळवून दिला आहे.
ऐतिहासिक पदकामुळे उंचावला आत्मविश्वास; स्वप्नपूर्तीचा अभिमान: रूपा बायोर
व्हिएतनाम येथे आयोजित आशिया स्पर्धेमध्ये ऐतिहासिक पदक जिंकल्याचा मला अभिमान आहे. या कांस्यपदकामुळे संघाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला पदक मिळवून देण्याची स्वप्नपूर्ती झाल्याचा मला मोठा आनंद झाला. फेडरेशनचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, प्रशिक्षक अभिषेक दुबे यांनी सर्वोत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यामुळे पथकाचा पल्ला निश्चितपणे गाठता आला, अशा शब्दात कांस्यपदक विजेती रूपाने आपल्या यशाचे श्रेय फेडरेशनला दिले आहे.
भारतीय संघ खालील प्रमाणे :
भारतीय पुमसे पुरुष संघात देबदास रॉय, मोहन कुमार क्रिश्नाह, राजेश खिल्लारी, वेलू बाबू मुरुगेश, एरिन नोबिस, सत्यप्रकाश मोहंती, समरजीत चक्र, जगन्नाथ बेहेरा, योगेश जोशी, माधेशवरन, तुषार स्वामी, रोहन गुहाल, कुणाल कुमार, हर्षवर्धन गुरूंग, अविनाश कुमार सहानी, अनुराग यादव. महिला संघ ः रुपा बायोर, हर्षा सिंघा, उषा धामणस्कर, गीता यादव, रितू यादव, शहनाज परवीन, सीता, श्रुती शिर्के, शिल्पा थापा, रितिका नेगी, गीता यादव. भारतीय क्युरोगी पुरुष संघ ः प्रशांत राणा, अजय कुमार, नवीन, भुमेश कुमार मैथिल, शिवांश त्यागी, ऋषभ.
क्युरोगी महिला संघ ः सक्षम यादव, रक्षा चहर, सानिया खान, अनुशिया प्रेमराज, इतिशा दास, रुदाली बारूआ.
पॅरा ताकवोंदो संघ : सधाम हुसेन थास्तागीर, वेन्नापुसा प्रशांत रेड्डी, हे या स्पर्धेमध्ये पदकाचे प्रबळ दावेदार आहेत.