(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022: निखत झरीनची 'सुवर्ण' कामगिरी, दिवसभरातील तिसरं सुवर्णपदक, भारताची पदकसंख्या 48 वर
Nikhat Zareen, WG 2022: कॉमनवेल्थ बॉक्सिंगच्या महिलांच्या 48-50 किलो वजनी गटात भारताच्या निकहत जरीननं सुवर्णपदक पटकावलं आहे.
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ बॉक्सिंगच्या महिलांच्या 48-50 किलो वजनी गटात भारताच्या निखत झरीननं (Nikhat Zareen) सुवर्णपदक पटकावलं आहे. निकहतनं अंतिम सामन्यात उत्तर आयर्लंडच्या कार्लीचा 5-0 नं पराभव केलाय. कॉमनवेल्थ स्पर्धेत निकहतनं पहिल्यांदाच भारतासाठी पदक जिंकलंय. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचे 48 वं पदक आहे. तर, आज दिवसभरातील हे तिसरं सुवर्णपदक आहे.
ट्वीट-
पदतालिकेत भारताची चौथ्या स्थानावर झेप
26 वर्षीय निकहत यावर्षी मे महिन्यात वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. तिनं कॉमनवेल्थ स्पर्धेत पदार्पणातच भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. या स्पर्धेतील भारताचं हे 17 वं सुवर्णपदक आहे. निखत झरीनच्या सुवर्ण यशानंतर भारतानं पदतालिकेतही न्यूझीलंडला मागं टाकलंय. दरम्यान, 17 सुवर्णपदकासह भारत चौथ्या स्थानावर झेप घेतलीय.
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी पदक जिकणाऱ्या खेळाडूंची यादी
सुवर्णपदक-16: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी) ), नीतू घणघस, अमित पंघल, एल्डहॉस पॉल, निखत झरीन.
रौप्यपदक-12: संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर.
कांस्यपदक- 19: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला संघ, संदीप कुमार, अन्नू राणी.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : 'चित भी मेरी, पट भी मेरी', ट्रीपल जम्पमध्ये सुवर्ण पदकासह रौप्यही भारताच्या खिशात, ऐलडॉस पॉलसह अब्दुलाची कमाल
- Commonwealth Games 2022: संदीप कुमारनं जिंकलं कांस्यपदक, 10 किमी चालण्याच्या शर्यतीत दमदार कामगिरी
- Amit Panghal,CWG 2022: अमित पंघालची सुवर्णपदकावर झडप, भारताची पदकसंख्या 43 वर