एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’
21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी भारतानं तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह एकूण सहा पदकांची कमाई केली.
सिडनी : भारताच्या महिला संघानं सांघिक टेबलटेनिसमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताच्या मोनिका बत्रानं 11-7, 11-4, 11-7 ने विजय मिळवला.
सिंगापूरला 3-1 अशी मात देत भारतीय संघाने सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. त्याआधी मौमा दास आणि मधुरीका या जोडीनं दुहेरीत विजय मिळवत भारताला आघाडी मिळवून दिली होती.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा चौथा दिवस
21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी भारतानं तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह एकूण सहा पदकांची कमाई केली. भारतीय नेमबाज मनू भाकेर आणि वेटलिफ्टर पूनम यादवसह भारताच्या महिलांनी सांघिक टेबल टेनिसचं सुवर्णपदक पटकावलं.
नेमबाजपटू हिना सिद्धूनं रौप्य तर रवी कुमारनं 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकावर आपली मोहोर उमटवली. याशिवाय वेटलिफ्टर विकास ठाकूरनही भारताला 94 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवून दिलं. त्यामुळे गोल्ड कोस्टच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आता भारताची एकूण पदकसंख्या 12 वर पोहोचली आहे. त्यात सात सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
CWG 2018 : 16 वर्षांच्या मनूला नेमबाजीत सुवर्ण, हीनाला रौप्य
CWG 2018 : 69 किलो वजनी गटात पूनम यादवला सुवर्ण
CWG 2018 : 317 किलो वजन उचललं, सतीश शिवलिंगमला सुवर्ण
CWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक
CWG 2018 : संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्ण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement