Ind Vs Sa T20 Series: आयपीएल संपली, आता आंतरराष्ट्रीय ऍक्शन सुरू! दक्षिण आफ्रिकेचा संघ 'या' दिवशी दिल्लीला पोहोचणार
Ind Vs Sa T20 Series: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची 29 मे 2022 ला सांगता झाली आहे. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे.
Ind Vs Sa T20 Series: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची 29 मे 2022 ला सांगता झाली आहे. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या टी-20 सामना येत्या 9 जूनला खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ 2 जून 2022 रोजी दिल्लीला पोहचणार आहे. तर, भारतीय क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू 5 जूनला दिल्लीत रवाना होतील, अशी माहिती दिल्ली क्रिकेट असोसिएशननं दिली आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख |
पहिला टी-20 सामना | 9 जून 2022 |
दुसरा टी-20 सामना | 12 जून 2022 |
तिसरा टी-20 सामना | 14 जून 2022 |
चौथा टी-20 सामना | 17 जून 2022 |
पाचवा टी-20 सामना | 19 जून 2022 |
भारतीय टी20 संघ-
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ-
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन.
हे देखील वाचा-
- Viral Video: फिल्डिंगदरम्यान टीम डेव्हिडची पँटच निसटली! मग पुढे काय झालं? पाहा व्हिडिओ
- Nashik Hanuman Birth Place : साधू महंतांच्या मानपमान नाट्यावर पडदा, शास्रार्थ सभेला सुरवात, 'या' धर्मग्रस्थांचा संदर्भ घेणार
- BMC Election 2022: दिग्गजांचे वॉर्ड झाले आरक्षित; यशवंत जाधव, अमेय घोले, महाडेश्वर, अळवणींना शोधावा लागणार दुसरा वॉर्ड