(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK: जीतेगा भाई जीतेगा... भर रस्त्यात पाकिस्तानी चाचांचा नारा; पण भारतीय चाहत्यांच्या चातुर्यापुढे चाचाही हरले, पाहा मजेशीर व्हिडीओ
India vs Pakistan Viral Video: पाकिस्तानच्या समर्थनार्थ 'जीतेगा भाई जीतेगा...' नारा देत असलेल्या पाकिस्तानी चाचांची भारतीय चाहत्यांनी चांगलीच फजिती केली आहे.
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आज विश्वचषक 2023 चा महामुकाबला खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) दुपारी 2 वाजता हा सामना सुरू होईल, अशातच सामन्यापूर्वी भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर आगळावेगळा सामना रंगला. पाकिस्तानी चाचांनी भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय चाहत्यांनी त्यांची चांगलीच फजिती केली. पाकिस्तानी चाचांचा (Pakistani Chacha) हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय चाहत्यांनी केली पाकिस्तानी चाचांची फजिती
'पाकिस्तानी चाचा' नावाने ओळखला जाणारे काका भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकीट खरेदी करण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर त्यांना भारतीय चाहत्यांची गर्दी दिसली. भारतीय प्रेक्षकांना पाहून त्यांना डिवचण्यासाठी पाकिस्तानी चाचाने घोषणा दिल्या, "जितगा भाई जितेगा पाकिस्तान जितेगा". मात्र, त्यांची घोषणा पूर्ण होण्यापूर्वीच भारतीय चाहत्यांनी "इंडिया जीतेगा" म्हणत प्रत्युत्तर दिलं आणि चाचांची चांगलीच फजिती केली. भारतीयांच्या चातुर्यावर आता नेमकं काय म्हणावं हे पाकिस्तानी चाचांना सुचेनासं झालं, त्यांनी डोक्याला हात लावला. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सामन्याची सर्वांनाच उत्सुकता
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. सामना नेमका कोण जिंकणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अनेकांनी सामना पाहण्यासाठी सुट्ट्या टाकल्या आहेत. काहींनी मित्रांसोबत सामना पाहण्याचा प्लॅन बनवला आहे. सोशल मीडियावर भारत विरुद्ध पाकिस्तान असा चांगलाच सामना रंगला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु झालं आहे. त्यामुळे कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारत आणि पाकिस्तान संघात टक्कर
भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज झालं असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आज भारत पाकिस्तान सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. दुपारी 1.30 वाजता नाणेफेक होईल. विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड आहे. भारताने विश्वचषकात पाकिस्तानमध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. या सर्व 7 सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.
हेही वाचा: