IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात; यापूर्वी बाबर आझमचा टीम इंडियाला सावधानतेचा इशारा
T20 World Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vsPAK)यांच्यात आज (23 ऑक्टोबर) टी-20 विश्वचषक2022 चा सुपर 12चा सामना खेळला जाणार आहे.
T20 World Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vsPAK)यांच्यात आज (23 ऑक्टोबर) टी-20 विश्वचषक2022 चा सुपर 12चा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उस्तुकता पाहायला मिळत असून क्रिकेटविश्वताही एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगणाऱ्या या सामन्याला काहीच मिनिटं शिल्लक असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं भारताला सावधानतेचा इशारा दिलाय.
कर्णधाराचा मधल्या फळीवर विश्वास
पाकिस्तानच्या संघाची मधली फळी खूपच कमकुवत आहे. पाकिस्तानचा संपूर्ण फलंदाजी सलामी जोडीच्या कामगिरीवर अवलंबून आहे, असं अनेकदा निर्दशनास आलंय. यावर बाबर आझम म्हणाला की, “आम्हाला मधल्या फळीवर विश्वास आहे. त्यांनी आम्हाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. ते कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी करतात."
सलामी जोडीच्या जोरावर पाकिस्ताननं अनेक सामने जिंकले
संघाची सलामी खूप जोडी मजबूत आहे. तर, मधली फळीतील फलंदाज अनेकदा संघर्ष करताना दिसले आहेत. पाकिस्तानची सलामी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी एकट्याच्या जोरावर संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. अलीकडेच, इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील सामन्यात पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीनं एकही विकेट न गमावता 200 धावांचं लक्ष्य पार केलं होतं.
भारतासाठी धोक्याची घंटा
दरम्यान, 2021 च्या विश्वचषकात भारताला पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघानं भारताला टी-20 विश्वचषकात पराभूत केलं. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या संघाला विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध संघर्ष करावा लागला. मात्र, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या जोडीनं अनेक वर्षांचा दुष्काळ संपवला. यामुळं आजच्या सामन्यात भारतीय संघ लवकरात लवकर पाकिस्तानची सलामी जोडी मैदानाबाहेर पाठवण्याचा प्रयत्न करेल.
संभाव्य संघ-
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
हे देखील वाचा-