एक्स्प्लोर
भारताचा न्यूझीलंडवर 6 धावांनी विजय, टी20 मालिका खिशात
भारत आणि न्यूझीलंड संघांमधला तिसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना पावसामुळे आठ-आठ षटकांचा करण्यात आला होता.

थिरुवनंतरपुरम : टीम इंडियानं थिरुवनंतरपुरममधल्या आठ-आठ षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव केला. तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली. भारत आणि न्यूझीलंड संघांमधला तिसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना पावसामुळे आठ-आठ षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी 68 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करुन न्यूझीलंडला आठ षटकांत सहा बाद 61 धावांत रोखलं. भारताकडून जसप्रीत बुमरानं दोन षटकांत केवळ नऊ धावा मोजून किवींच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी टीम इंडियानं या सामन्यात आठ षटकांत पाच बाद 67 धावांची मजल मारली होती. भारताकडून मनीष पांडेनं सर्वाधिक 17 धावांची खेळी केली. हार्दिक पंड्यानं नाबाद 14, तर विराट कोहलीनं 13 धावांची खेळी केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























