IND vs ENG 2nd Test LIVE Cricket Score Updates: तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडपुढची संकटं वाढली, तीन खेळाडू तंबूत माघारी

IND vs ENG 2nd Test LIVE Cricket Score Updates: भारत आणि इंग्लंडदरम्यानचा हा दुसरा कसोटी सामना आहे. चार सामन्यांच्या मालिकेत पहिली कसोटी जिंकत इंग्लंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Feb 2021 05:19 PM
तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडपुढची संकटं वाढली, तीन खेळाडू तंबूत माघारी गेल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला इंग्लंडची धावसंख्या 3 गडी बाद 53 धावा
अवघ्या 52 धावांवर इंग्लंडचे 3 खेळाडू तंबूत माघारी गेले आहेत. त्यामुळं या संघापुढची संकटं वाढताना दिसत आहेत. जॅक लेंच धावसंख्येचं खातं उघडल्याविनाच अक्षर पटेलला विकेट देऊन बसला.
आर अश्विनचे शानदार शतक, अश्विनच्या शतकाने टीम इंडिया मजबूत स्थितीत
दुसऱ्या डावात भारताचा डावही गडगडला, सहा गडी बाद, आघाडी तीनशेच्या वर, विराट कोहली आणि अश्विन मैदानात
भारताच्या 50 धावा पूर्ण, रोहित 23 आणि पुजारा 7 धावांवर फलंदाजी करत आहे. भारताकडे एकूण 247 धावांची आघाडी
भारताला पहिला धक्का; शुभमन गिल 14 धावांवर बाद
चहापानापर्यंत इंग्लंडचा डाव गडगडला, इंग्लंडची आठवी विकेट, स्टोन बाद, अश्विननं घेतली विकेट
IND vs ENG 2nd Test LIVE Cricket Score Updates: इंग्लंडला सातवा धक्का, मोईन अली बाद, अक्षरनं घेतली विकेट, अजिंक्य रहाणेनं पकडला अफलातून झेल
भारताचा डाव 329 धावांवर आटोपला, ऋषभ पंत 58 धावांवर नाबाद, मोईन अलीच्या चार विकेट
इंग्लंडला मोठा धक्का, सिब्ली पाठोपाठ कर्णधार रुटही बाद, अक्षरनं घेतली रुटची विकेट, इंग्लंडची अवस्था 3 बाद 32
इंग्लंडला पाचवा धक्का, बेन स्टोक बाद, अश्विननं घेतली विकेट, इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत, भारत मजबूत स्थितीत
दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात होताच भारताला दोन धक्के, अक्षर पटेलपाठोपाठ इशांतही बाद, मोईन अलीच्या चार विकेट
इंग्लंडला पहिला धक्का, बर्न्स शून्यावर बाद, इशांतनं घेतली विकेट
रोहित शर्मामागोमाग अजिंक्य रहाणेही तंबूत परत 249 धावसंख्या करणाऱ्या भारतीय संघाला पाचवा धक्का.
लंचपर्यंत इंग्लंडची अवस्था बिकट, चार विकेट गमावल्या, अश्विनने दोन, अक्षर आणि इशांतनं घेतली एक-एक विकेट इंग्लंडची अवस्था 4 बाद 39
पहिल्या दिवसाचा खेळ संपताक्षणी भारतीय संघाचे 6 खेळाडू तंबीत परतले. यावेळी संघाची धावसंख्या 300 वर पोहोचली. पहिल्या दिवसअखेर अक्सर पटेल आणि ऋषभ पंत बिनबाद. आतापर्यंत 88 षटकांचा खेळ पूर्ण.
आर. अश्विनच्या रुपानं यजमानांना सहावा धक्का, तर पाहुण्या इंग्लंडच्या संघाला यश. भारतीय संघाच्या धावसंख्येचा वेग मंदावला
संघाच्या धावसंख्येत 161 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान देत रोहित शर्मा तंबूत परतला. मैदानात उपस्थित क्रीडारसिकांनी टाळ्या वाजवत त्याच्या या खेळीचं कौतुक केलं
रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेची शतकी भागीदारी, रोहित 132 तर अजिंक्य 36 धावांवर नाबाद
70 षटकांच्या खेळानंतर भारतीय संघाची धावसंख्या 3 गडी बाद 133 धावा. रोहित शर्माचा खेळपट्टीवर दबदबा.
रोहित शर्माचं शानदार शतक, रहाणे सोबतीनं भारताचा डाव सावरला, भारत 148 वर 3 विकेट्स
भारताला मोठा धक्का, पुजारा पाठोपाठ विराटही शून्यावर बाद, मोईन अलीनं घेतली विकेट, भारताची अवस्था 3 बाद 86
पहिल्या सत्राचा खेळ थांबला, रोहित नाबाद 80 तर रहाणे 5 धावांवर मैदानात, भारताची स्थिती 106 वर 3 विकेट्स
पुजारा 21 धावांवर बाद, लीचनं घेतली विकेट, भारताची अवस्था 2 बाद 85, विराट कोहली मैदानात
चेन्नईतल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतानं या कसोटीसाठी अक्षर पटेल आणि कुलदीप यादवला संधी दिली आहे. शाहबाज नदीमऐवजी अक्षर, तर वॉशिंग्टन सुंदरऐवजी कुलदीप खेळेल. तसंच जसप्रीत बुमराला विश्रांती देऊन मोहम्मद सिराजला खेळवण्यात येत आहे.
भारताला पहिला धक्का, शुभमन गिल शून्यावर बाद
रोहित शर्माचं अर्धशतक, भारत 64 वर एक विकेट, पुजारा 14 धावांवर नाबाद

पार्श्वभूमी

IND vs ENG 2nd Test LIVE Cricket Score Updates:  चेन्नईतल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतानं या कसोटीसाठी अक्षर पटेल आणि कुलदीप यादवला संधी दिली आहे. शाहबाज नदीमऐवजी अक्षर, तर वॉशिंग्टन सुंदरऐवजी कुलदीप खेळेल. तसंच जसप्रीत बुमराला विश्रांती देऊन मोहम्मद सिराजला खेळवण्यात येत आहे.


 


इंग्लंडच्या संघातून डॉम बॅस, जेम्स अॅन्डरसन, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर या खेळाडूंना संघातून बाहेर ठेवण्यात आलं असून हे चार खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीत. इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाच नव्या खेळाडूंचा समावेश केला आहे. मोईन अली, बेन फोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड हे खेळाडू दुसरा कसोटी सामना खेळणार आहेत. क्रिस व्होक्स आणि ओली स्टोन या दोन खेळाडूंमधील एक खेळाडू अंतिम अकरा जणांत खेळणार आहे.


 


या आधी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 227 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंडने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


 


IND vs ENG : T20 सीरिजसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा; 'हा' धडाकेबाज खेळाडू संघाबाहेर


 


डॉम बॅस, जेम्स अॅन्डरसन आणि जोस बटलर या तीन खेळाडूंना संघाने विश्रांती देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. तर जोफ्रा आर्चर हा जखमी असल्याने संघाच्या बाहेर आहे. जोस बटलर या पुढचे तीनही सामने खेळू शकणार नाही कारण तो इंग्लंडला परत गेला आहे. बेन फोक्स आता इंग्लंडच्या संघामध्ये विकेट कीपिंगचे काम करणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.