एक्स्प्लोर

Kohli T20 Record : विराटची शानदार खेळी, अनेक विक्रमांना गवसणी

टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात मागच्या परभवाचा वचपा काढत इंग्लंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

अहमदाबाद : टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात मागच्या परभवाचा वचपा काढत इंग्लंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यासह विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. 

या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले. कोहलीच्या नावे आता टी20 सामन्यात सर्वाधिक अर्धशतकं बनवण्याचा विक्रम झाला आहे. त्यानं रोहित शर्माला मागे टाकलं आहे. रोहितच्या नावे टी 20 मध्ये 25 अर्धशतकं आहेत तर विराटची 26 अर्धशतकं झाली आहेत.  

तसेच या अर्धशतकासह विराट टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. 

सर्वाधिक धावा करणारे जगातील पाच खेळाडू
विराट कोहली (भारत) - 3001 रन

मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड) - 2839 रन

रोहित शर्मा (भारत) - 2773 रन

एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) - 2346 रन 

शोएब मलिक (पाकिस्तान) - 2335 रन

मागच्या सामन्यात केला होता लाजिरवाणा विक्रम 
Ind vs Eng टी20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात 14 व्या वेळेस विराट एक कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाला. यानंतर विराट हा असा कर्णधार बनला आहे जो बहुतेक वेळा शून्यावर बाद झाला.  या विक्रमामध्ये विराटपूर्वी सौरव गांगुलीच्या नावाचा समावेश होता, जो कर्णधार म्हणून 13 वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यामागोमाग धोनी (11 वेळा), कपिल देव (10 वेळा) आणि मोहम्मद अझरुद्दीन (8 वेळा) यांच्याही नावाचा समावेश आहे.

पदार्पणाच्याच सामन्यात इशान किशनचं तुफानी अर्धशतक 
कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन या दोघांनी विजयी खेळी साकारली. कर्णधार विराट कोहलीने 46 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी साकारली. याशिवाय ईशान किशनने आपला पहिला सामना खेळत 32 बॉलमध्ये 56 धावा केल्या. भारतीय संघातील युवा खेळाडू इशान किशन यानं रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात पदार्पणाच्याच खेळीत क्रीडारसिकांची मनं जिंकली. संघातील आपली निवड सार्थ ठरवत त्यानं निवड समितीलाही आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली आहे.इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या टी20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इशान किशन यानं 28 चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली. चौकार आणि षटकारांची बरसात करत त्यानं विरोधी संघाच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. षटकाराच्याच सहाय्यानं त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं एकूण 32 चेंडूंमध्ये 56 धावांची प्रभावी खेळी करत सर्वांचीच दाद मिळवली. 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Pakistan Ceasefire : भारताच्या शत्रूची मोठी घोषणा! परिस्थिती कशीही असो, आम्ही पाकिस्तानच्या पाठीशी उभे आहोत...  चीनचा खुलेआम पाठिंबा
भारताच्या शत्रूची मोठी घोषणा! परिस्थिती कशीही असो, आम्ही पाकिस्तानच्या पाठीशी उभे आहोत... चीनचा खुलेआम पाठिंबा
बुडत्याचा पाय खोलात! IMF कडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेऊनही पाकिस्तानची स्थिती सुधारणार नाही
बुडत्याचा पाय खोलात! IMF कडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेऊनही पाकिस्तानची स्थिती सुधारणार नाही
India Warning To Pakistan :  पाकिस्ताननं स्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, शस्त्रसंधीचं उल्लंघन निंदनीय, सैन्याला चोख उत्तर देण्याचे आदेश : विक्रम मिसरी
पाकिस्ताननं स्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, शस्त्रसंधीचं उल्लंघन निंदनीय, सैन्याला चोख उत्तर देण्याचे आदेश : विक्रम मिसरी
पाक हा विश्वासघातकीच,ट्रम्पला विचारायला हवं, तात्या तुम्ही हे काय केलं? अरविंद सावंतांचा पाकिस्ताकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होताच सवाल
पाक हा विश्वासघातकीच,ट्रम्पला विचारायला हवं, तात्या तुम्ही हे काय केलं? : अरविंद सावंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

China Support Pakistan : चीन उतरलं पकिस्तानच्या समर्थनात, भारताविरोधात कुरघोडी सुरुचVikram Misri on Pak Voilattion : भारतीय सैन्याला कारवाई करण्यासाठी स्वातंत्र्य : विक्रम मिस्रीPakistan Voilates Ceasefire : पाकीस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, उमर अब्दुल्लांकडून दुजोराInd Vs Pak Tention : 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमोमध्ये चर्चा होणार, शस्त्रसंधी लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Pakistan Ceasefire : भारताच्या शत्रूची मोठी घोषणा! परिस्थिती कशीही असो, आम्ही पाकिस्तानच्या पाठीशी उभे आहोत...  चीनचा खुलेआम पाठिंबा
भारताच्या शत्रूची मोठी घोषणा! परिस्थिती कशीही असो, आम्ही पाकिस्तानच्या पाठीशी उभे आहोत... चीनचा खुलेआम पाठिंबा
बुडत्याचा पाय खोलात! IMF कडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेऊनही पाकिस्तानची स्थिती सुधारणार नाही
बुडत्याचा पाय खोलात! IMF कडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेऊनही पाकिस्तानची स्थिती सुधारणार नाही
India Warning To Pakistan :  पाकिस्ताननं स्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, शस्त्रसंधीचं उल्लंघन निंदनीय, सैन्याला चोख उत्तर देण्याचे आदेश : विक्रम मिसरी
पाकिस्ताननं स्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, शस्त्रसंधीचं उल्लंघन निंदनीय, सैन्याला चोख उत्तर देण्याचे आदेश : विक्रम मिसरी
पाक हा विश्वासघातकीच,ट्रम्पला विचारायला हवं, तात्या तुम्ही हे काय केलं? अरविंद सावंतांचा पाकिस्ताकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होताच सवाल
पाक हा विश्वासघातकीच,ट्रम्पला विचारायला हवं, तात्या तुम्ही हे काय केलं? : अरविंद सावंत
काश्मीर बॉर्डरवर BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद; पाकिस्तानला प्रत्त्युत्तर देताना वीरमरण
काश्मीर बॉर्डरवर BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद; पाकिस्तानला प्रत्त्युत्तर देताना वीरमरण
पाकिस्ताननं खरा रंग दाखवला, शस्त्रसंधीचा भंग करत ट्रम्प यांना तोंडघशी पाडलं, भारत आता पुढं काय करणार? 'हा' पर्याय उपलब्ध
पाकिस्ताननं खरा रंग दाखवला, शस्त्रसंधीचा भंग करत ट्रम्प यांना तोंडघशी पाडलं, भारत आता पुढं काय करणार?
युद्ध थांबलं पण दहशतवादविरुद्ध कारवाई थांबणार नाही; शस्त्रसंधीनंतर परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं
युद्ध थांबलं पण दहशतवादविरुद्ध कारवाई थांबणार नाही; शस्त्रसंधीनंतर परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं
Video कुत्र्याचं शेपूट वाकडंच; पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; ओमर अब्दुल्लांनीच शेअर केला व्हिडिओ
Video कुत्र्याचं शेपूट वाकडंच; पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; ओमर अब्दुल्लांनीच शेअर केला व्हिडिओ
Embed widget