Yuvraj Singh : संधी मिळूनही हाराकिरी करणाऱ्या श्रेयसला युवराज सिंगने कडक शब्दात सुनावले; म्हणाला संघाला गरज असताना..
टीम इंडियाची दोन षटकांमध्ये तीन बाद पाच अशी अवस्था झाली होती. त्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला. मात्र चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला.
चेन्नई : वर्ल्डकपच्या (ICC Cricket World Cup 2023) सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) अवघ्या 199 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर फलंदाजासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. टीम इंडियाची दोन षटकांमध्ये तीन बाद पाच अशी अवस्था झाली होती. त्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला. मात्र चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी श्रेयस अय्यर दोन विकेट गमावल्या असताना अनावश्यक फटका मारण्याच्या नादात बाद झाला आणि भारताने तिसरी विकेट गमावली. त्याच्या या शॉर्ट सिलेक्शनवर 2011 वर्ल्डकपचा हिरो सिक्सर किंग युवराज सिंगने ट्विट करत कडक शब्दात सुनावले. युवराजने त्याला (Yuvraj Singh on shreyas iyer) जबाबदारीने खेळण्याचा सल्ला दिला.
No 4 batsman has to absorb the pressure !! Need better thinking from @ShreyasIyer15 when team is trying to rebuild their innings ! Still don’t understand why @klrahul is not batting at no 4 ! After scoring a 100 against Pakistan ! Dropping @imVkohli might cost australia big time…
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 8, 2023
युवराज आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजाने दबावात खेळण्यास शिकलं पाहिजे. जेव्हा संघाला गरज असते त्यावेळी योग्य पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. युवराज पुढे म्हणाला की, मला अजूनही समजलं की लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर का फलंदाजी करत नाही? पाकिस्तानविरुद्ध शंभर करूनही. तसेच त्याने विराट कोहलीला दिलेलं जीवदाना सुद्धा ऑस्ट्रेलियाला महागात पडेल, असे म्हटले आहे. विराट सामना केव्हाही हिरावून घेऊ शकतो असेही त्यांनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तत्पूर्वी, भारताच्या जडेजा आर. आश्विन आणि कुलदीप या त्रिकूटाने केलेल्या दमदार कामगिरीचा जोरावर ऑस्ट्रेलियाला अवघ्या 199 धावांत गुंडाळले. 200 मापक आव्हान घेऊन उतरलेल्या भारताची सुरवात अत्यंत निराशाजनक झाली. त्यामुळे पुन्हा एकदा 2019 वर्ल्डकपच्या पहिल्या लढतीची आठवण झाली आहे. त्यावेळी सुद्धा न्यूझीलंडविरोधात भारताला तीन बाद पाच असा सामना करावा लागला होता. त्यावेळी भारताने हा सामना गमावला होता. त्यामुळे आजच्या लढतीत आता मैदानात विराट कोहली, लोकेशन राहुल असून ते कशी लढत देतात यावर सामन्याचं चित्र अवलंबून असेल.
इतर महत्वाच्या बातम्या