Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ‘कसोटी’, पाहा कोणाचं पारडं जड
भारतासाठी खेळाचं हे नवं स्वरुप अतिशय नवखं आहे, त्यामुळंच ऑस्ट्रेलियाचा संघ इथं अधिक भक्कम स्थानी दिसत आहे. डे- नाईट टेस्टबाबत सांगावं तर, या स्वरुपात ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वात अनुभवी असाच आहे.

नवी दिल्ली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) कसोटी (test) सामन्यांची सुरुवात गुरुवारपासून एडिलेड ओवल मैदानात डे- नाईट कसोटीनं होत आहे. भारतासाठी खेळाचं हे नवं स्वरुप अतिशय नवखं आहे, त्यामुळंच ऑस्ट्रेलियाचा संघ इथं अधिक भक्कम स्थानी दिसत आहे. डे- नाईट टेस्टबाबत सांगावं तर, या स्वरुपात ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वात अनुभवी असाच आहे. आतापर्य़ंत या संघानं 7 डे- नाईट कसोटी सामने खेळले आहेत. ज्यपैकी चार सामने एडिलेड ओवलमध्येच खेळले गेले आहेत. तर, भारतीय क्रिकेट संघानं मात्र आतापर्यंत अशा प्रकारचा एकच सामना खेळला आहे.
एडिलेडमध्ये भारतीय संघानं केलेलं प्रदर्शन पाहता ही संघासाठी जमेची बाजू ठरु शकते. 2018-2019 च्या दौऱ्यात भारतीय संघानं एडिलेडमध्ये विजयी प्रदर्शन केलं होतं. भारतीय संघानं दुसरा सराव सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे ‘पिंक बॉल’नं खेळला होता. या सामन्यात संघातील आघाडीचे खेळाडू कोहली, चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन, रिद्धिमान साहा आणि उमेश यादव सहभगी नव्हते. पण, या सर्वच खेळाडूंना एडिलेड टेस्टसाठी भारतीय संघातील अंतिम प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे.
Specail Report | अॅडिलेड ओव्हलची खासियत काय आहे? अॅडिलेडमधून गौरव जोशींचा रिपोर्ट
सलग तीन दिवस सातत्यानं रात्रीच्या वेळी सेंटर विकेटवर सराव केल्याचा आपल्या संघाला फायदाच होणार आहे, असं ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टिम पेन यानं स्पष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून अंतिम प्लेइंग 11 ची निवड करण्यात आली असली, तरीही याची घोषणा मात्र अद्यापही करण्यात आलेली नाही. तर, भारतीय संघानं प्लेइंग 11 जाहीर केलं आहे.
IND vs AUS | कसोटी सामन्यांतील दोन्ही संघाचा रंजक इतिहास; काय म्हणतात आकडे? कोणाचं पारडं भारी?
मयंक अग्रवालसह भारतीय संघाची सुरुवात कोण करणार असा प्रश्न असतानाच संघाकडून पृथ्वी शॉची निवड करण्यात आली आहे. यष्टीरक्षकाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती उदभवलेली असतानाच साहा ऋषभ पंतहून सरस ठरला आहे.
कसे असतील संघ?
भारत : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया : टिम पेन (कर्णधार), जोए बर्न्स, पॅट कमिंस, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मोइजेज हेनरिक्स, मार्नस लाबुशॅन, नाथन लॉयन, मिशेल नासेर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मिसेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर (संभाव्य संघ)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
