(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS | कसोटी सामन्यांतील दोन्ही संघाचा रंजक इतिहास; काय म्हणतात आकडे? कोणाचं पारडं भारी?
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी बजावली आहे. दोन्ही संघाचा रंजक इतिहास काय सांगतो? आकडेवारी काय सांगते? जाणून घेऊया...
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जेव्हा जेव्हा कसोटी सामने असतात तेव्हा तेव्हा प्रत्येक भारतीयाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असले. ऑस्ट्रेलियाने रेड बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच भारतावर वर्चस्व मिळवले आहे. तरी देखील मागील काही काळात भारतीय संघ कांगारूंसाठी एक मोठे आव्हान म्हणून समोर आला आहे. अखेरच्या दौर्यात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं असेल, पण यावेळी भारताला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवणं तेवढं सोपं नाही. कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी बजावली आहे आणि आकडेवारी काय म्हणते ते जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताची कामगिरी
भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 48 कसोटी सामने खेळले आहेत. यात भारताने केवळ सात कसोटी सामने विजय मिळवला आहे तर 29 कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, आतापर्यंत 12 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये भारताने फक्त एकचं कसोटी मालिका जिंकली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर कांगारूंचा 2-1 असा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा भारत आशियातील एकमेव देश आहे.
भारत vs ऑस्ट्रेलिया : आकडेवारी काय सांगते
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आतापर्यंत एकूण 98 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 42 सामन्यांत तर भारताने 28 सामन्यांत विजय मिळविला आहे. आतापर्यंत 27 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात एक कसोटी सामनादेखील अनिर्णित झाला होता. 1986 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथे कसोटी सामना खेळला गेला होता. आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.
World Test Championship : भारताला मागे टाकत ऑस्ट्रेलिया अव्वल
ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे, तर भारत दुसर्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचे सरासरी 82.22 टक्के, तर भारताचे 75 टक्के गुण आहेत. न्यूझीलंड पॉईंट टेबलवर 62.5 टक्क्यांसह तिसर्या क्रमांकावर आहे. याआधीच्या पॉईंट टेबलमध्ये भारत अव्वल स्थानावर होता, पण त्यादरम्यान आयसीसीने नियम बदलले. ज्यामुळे भारतीय संघ दुसर्या क्रमांकावर आला आणि ऑस्ट्रेलियन संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला. पॉईंट टेबलमधील बदलावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही काही प्रश्न उपस्थित केले आहे.