एक्स्प्लोर

IND vs AUS 4th test : ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन, भारताची विजयाकडे वाटचाल

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला असून टीम इंडियाकडे 322 धावांची आघाडी आहे. भारताकडून कुलदिप यादवने 5 रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीनं 2 तर बुमराहने एका फलंदाजांला माघारी धाडले.

सिडनी   : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या कसोटीत आज चौथ्या दिवशी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 300 वर रोखले आहे. पावसामुळे हा सामना सुरू होण्यास विलंब झाल्याने उपाहारापर्यंतचा खेळ वाया गेला होता.  उपाहाराच्या विश्रांतीनंतर खेळाला सुरूवात झाली. पुढे खेळताना यजमानांनी 3 गडी झटपट गमावले. मात्र ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने चांगली झुंज दिली. अखेर कुलदीप यादवच्या वादळासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 300 वर आटोपला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला असून टीम इंडियाकडे 322 धावांची आघाडी आहे. भारताकडून कुलदीप यादवने 5 रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीनं 2 तर  बुमराहने एका फलंदाजांला माघारी धाडले. ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या चौथ्या अंतिम कसोटी सामन्यात पाऊस ऑस्ट्रेलियन संघाचा तारणहार बनून आला होता. चौथ्या दिवशी पावसामुळे उपहारापर्यंत एकही चेंडू खेळला गेला नाही.  तिसऱ्या दिवसाचा खेळदेखील अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवण्यात आला होता. सिडनी कसोटीत टीम इंडियाच्या प्रभावी माऱ्यामुळे तिसऱ्या दिवशी चहापानानंतर ऑस्ट्रेलियाची सहा बाद 236 अशी अवस्था झाली होती. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरिसनं आठ चौकारांसह 79 धावांची खेळी उभारली. पण हॅरिस वगळता कांगारुंच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला होता.   सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या दमदार शतकांमुळे टीम इंडियाने सिडनी कसोटीत आपला पहिला डाव सात बाद 622 धावांवर घोषित केला. भारताने ऑस्ट्रेलियात उभारलेली ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. भारताच्या चेतेश्वर पुजाराचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकले. त्याने 373 चेंडूंचा सामना करताना 193 धावांची बहारदार खेळी केली. त्यात 22 चौकारांचा समावेश होता. पुजारापाठोपाठ रिषभ पंतनेही कसोटी कारकीर्दीतले दुसरे शतक झळकावले. त्याने 15 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 159 धावांचे योगदान दिले. पंतने रवींद्र जाडेजाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली. जाडेजानेही 107 चेंडूत 81 धावा केल्या. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने बिनबाद 24 धावांची मजल मारली होती.

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs IND 4th T20 : पहिल्या सामन्यात 14, दुसऱ्यात 13 धावा... वैभवचा निकाल नापास! पण तरी प्लेइंग-11 मधून नाही होणार बाहेर? टीम इंडियाच्या प्रयोगशाळेत बळी पडला संजू?
पहिल्या सामन्यात 14, दुसऱ्यात 13 धावा... वैभवचा निकाल नापास! पण तरी प्लेइंग-11 मधून नाही होणार बाहेर? टीम इंडियाच्या प्रयोगशाळेत बळी पडला संजू?
Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाचा विजय की रेफरीची कृपा? मेस्सीच्या विजयानंतर फुटबॉल जगतात खळबळबळ, इजिप्तचा संताप, फिफावर केले नको नको ते आरोप
अर्जेंटिनाचा विजय की रेफरीची कृपा? मेस्सीच्या विजयानंतर फुटबॉल जगतात खळबळबळ, इजिप्तचा संताप, फिफावर केले नको नको ते आरोप
Dada First Look Out: सौरव गांगुलीच्या फिल्मचं पोस्टर रिलीज, नेटकरी संतापले, म्हणाले, 'बापरे हे काय? दादा एवढे वाईट दिवसही नाही आलेत...'
सौरव गांगुलीच्या फिल्मचं पोस्टर रिलीज, नेटकरी वैतागले, म्हणाले, 'बापरे हे काय? दादा एवढे वाईट दिवसही नाही आलेत...'
Ind vs Eng 3rd T20 : चूक तीच, जखमही तीच... वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी; जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या षटकात नेमकं काय घडलं?, टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!
चूक तीच, जखमही तीच... वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी; जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या षटकात नेमकं काय घडलं?, टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
Embed widget