एक्स्प्लोर

IND vs AFG: टीम इंडियाचा अफगाणिस्तानविरोधात धावांसह विक्रमांचाही पाऊस, सामन्यात काय-काय विक्रम झाले वाचा....

IND vs AFG:  टी 20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. भारताने निर्धारित 20 षटकात 210 धावांचा पाऊस पाडला. या सामन्यामध्ये धावांच्या पावसासह विक्रमांचा देखील पाऊस पडला.

IND vs AFG:  टी 20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पहिल्या दोन पराभवानंतर काल अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला.  या सामन्यात भारताने निर्धारित 20 षटकात 210 धावांचा पाऊस पाडला. या सामन्यामध्ये धावांच्या पावसासह विक्रमांचा देखील पाऊस पडला. 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 144 धावाच करू शकला. भारताचे रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनी  जबरदस्त सुरुवात केली. राहुलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 69 धावा केल्या. तसेच रोहितने 47 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. या दोघांनी 140 धावांची सलामी भागीदारीही रचली.

सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारीदरम्यान दोघांनी एका विक्रमाला गवसणी घातली. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 140 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यान या दोघांनी वैयक्तीक अर्धशतकं केली. टी20 विश्वचषक स्पर्धेत एकाच सामन्यात दोन्ही भारतीय सलामीवीरांनी अर्धशतक ठोकण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 2007 सालच्या  विश्वचषक स्पर्धेत इंग्लडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्यावेळी डर्बनला झालेल्या या सामन्यात सेहवागने 68 धावांची आणि गंभीरने 58 धावांची भागीदारी केली होती. 
 
विश्वचषकात भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा आणि केएल राहुल पहिल्या स्थानावर पोहोचले. या यादीत दुसऱ्या स्थानावर विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर आहेत. त्यांनी 2007 साली इंग्लंडविरुद्ध 136 धावांची भागीदारी केली होती. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्ध 106 धावांची भागीदारी केली होती.

 सलामीवीर रोहित शर्माला उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.  रोहितला त्याच्या शानदार 74 धावांच्या खेळीमुळं सामनावीर पुरस्कार मिळाला. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार मिळण्याची त्याची ही अकरावी वेळ आहे. रोहित या सामन्यात मिळालेल्या या पुरस्कारानंतर आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेल्या पहिल्या पाच खेळाडूंमध्येही सहभागी झाला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीनं सर्वाधिक 13 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. तर भारताच्या विराट कोहलीनं 12 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.  
  
रोहित शर्माने  टी 20 विश्वचषक स्पर्धेत  सात वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची कामगिरी केली आहे. या यादीत आता तो महेला जयवर्धनेसह तिसऱ्या स्थानी आहे.  विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 10 वेळा अशी कामगिरी केली आहे. ख्रिस गेलने नऊ वेळा 50 धावांचा आकडा गाठला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थितRajkiya Shole on Saif Ali khan | हायटेक सुरक्षा असतानाही हल्लेखोर सैफच्या घरात शिरलाच कसा?Zero Hour on Nashik | महापालिकेचे महामुद्दे: नाशिक शहराचे उद्यानं धुळ खात पडलीतZero Hour on Dhule| धुळे पालिकेच्या कामाचा क्रमच उलटा, आधी रस्ते केले मग पुन्हा गटारांसाठी  खोदले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget