(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI vs SRH, Head to Head : मुंबई विरुद्ध दिल्लीमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
IPL : आयपीएलमध्ये आजवर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ तब्बल 17 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत.
MI vs SRH : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (MI vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत. आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. मुंबईने आतापर्यं 9 तर हैदराबादने 7 सामने गमावले आहेत. गुणतालिकेत दोघेही अनुक्रमे दहाव्या आणि आठव्या स्थानी असल्याने दोघांचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पण अस्तित्त्वाच्या लढाईसाठी दोन्ही संघाकडून आज विजयसाठी दमदार खेळ पाहायला मिळू शकतो.
मुंबई विरुद्ध हैदराबाद Head to Head
आयपीएलमध्ये आजवर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs sunrisers hyderabad) हे संघ 17 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी अतिशय अटीतटीची लढत दिली आहे. पण मुंबईने (MI) एक सामना अधिक जिंकत 9 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादने (SRH) 8 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. पण यंदा मुंबईचा फॉर्म अधिक खराब असल्याने आजच्या सामन्यात नेमकं काय होईल? हे पाहणं औत्सुक्याचं राहिल.
आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
मुंबई - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), तिलक वर्मा, रितीक शौकीन, टीम डेव्हिड, रमनदीप सिंह, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, रिले मॅरिडथ, कुमार कार्तिकेय
हैदराबाद - अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जे सुचित, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी. नटराजन
हे देखील वाचा-